पुणे :-
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे श्री.शिवप्रतिष्ठान च्या वतीने आज मंगळवार दि.२१ फेब्रुवारीपासून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
धारकरी गौरव शेलार,अतुल गायकवाड,सतिश गायकवाड यांनी ही माहिती दिली.
ग्रामपंचायत पटांगणावर रात्री ८ वाजता धर्मवीर छत्रपती संभाजीमहाराज यांच्या प्रतिमेचे पुजन धारक-यांच्या वतीने करण्यात येणार असून श्री.स़ंभाजी सूर्यहृदय सामुहिक श्लोक म्हणण्यात येणार आहे.
फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या काळात चहा,गोड पदार्थ न खाणे, मांसाहार न करणे, शुभप्रसंग टाळणे, स्वत: आयोजित न करणे, मुंडण करणे, पायात चप्पल न घालणे, गादीवर न झोपणे, टी व्ही न बघणे, आवडीच्या गोष्टी न करणे यामधील ज्यांना जे शक्य होईल त्या त्या गोष्टींचे पालन करणे असे आवाहन शिवपाईक धारक-यांनी केले आहे.
एन टी व्ही न्यूज मराठी
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे
शिरूर जि.पुणे
8975598628
