औद्योगिक वसाहतीमध्ये आपली कोणीही आर्थिक पिळवणूक, फसवणूक करीत असल्यास शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे समक्ष तक्रार करावी असे आवाहन शिक्रापूर पोलीसांनी फलकाद्वारे केले आहे.
औद्योगिक कंपन्या,गोडावून व इतर औद्योगिक आस्थापनामध्ये कोणीही लेबर, स्क्रॅप, केटरिंग, ट्रान्स्पोर्ट, सिक्युरिटी,पाणी टँकर ,हाऊस किपिंग, इतर सुविधा पुरविण्याकरिता कामाचा ठेका मिळावा यासाठी जबरदस्ती करीत असल्यास अथवा धमकावित असल्यास , माथाडी संघटना,कामगार संघटना, यांच्यावतीने अथवा इतर कोणी जोर जबरदस्ती करीत असल्यास,धमकावित असल्यास ,औद्योगिक कंपन्या, गोडावूनमध्ये कामाची अडवणूक, खंडणीची मागणी, दहशत,गुंडगिरी करून जबरदस्तीने हप्ता वसुली करीत असल्यास ,माथाडी कामगार प्रत्यक्ष कामावर न ठेवता त्याबदल्यात पैशाची मागणी करत असल्यास अथवा धमकावित असल्यास याप्रमाणे कोणतीही तक्रार असल्यास शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे तक्रार करावी अथवा पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर 9077100100, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पठारे 8369079611, गोपनीय विभाग संदीप कारंडे 8605010012 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन शिक्रापूर पोलीसांनी फलकाद्वारे केले आहे.
एन टी व्ही न्यूज मराठी
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे शिरूर जि.पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *