पुणे :-
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शिरूर ग्रामीण व विद्याधाम प्रशाला शिक्रापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला जागतिक मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
“लेखक, कवी आपल्या भेटीला” हा अनोखा कार्यक्रम यानिमित्ताने प्रशालेत घेण्यात आला. मनोहर परदेशी यांनी या कार्यक्रमात “”सांडलेले शब्द आपुले, पुन्हा गोळा करून घ्यावे, हरवलेल्या माणसांना, पुन्हा नव्याने शोधीत जावे ” ही रचना सादर करून माणुसकी जपण्याचे आवाहन केले कवी नानासाहेब गावडे यांनी “”काळजाच्या तुकड्याची,ऐक विनवणी बाई,नको गर्भातच मारु, तुझ्या सोनुलीला आई” ही कविता सादर करून रसिकांना भावनिक साद घातली तर कवी सागर शिंदे यांनी “”भुई भेगाळली सारी” ही कविता सादर करून शेतकरी जीवन सांगितले. लेखक शेखर फराटे यांनी आपला लिखाणाचा प्रवास अत्यंत रंजक पध्दतीने मांडला.लेखक सुभाष कुरुंदळे यांनी विनोदी कथा सांगुन प्रेक्षकांना हसत ठेवले
यावेळी प्राचार्य सोनबापू गद्रे सर व शाळा व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष श्री. सुनिलभाऊ मांढरे सर यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. माऊली कुंभार सर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. रोहिणी नरके यांनी केले उपप्राचार्य सुनील थोरात यांनी आभार मानले.
एन टी व्ही न्यूज मराठी
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे शिरूर जि.पुणे 8975598628
