पुणे : अपहरण करून मर्डर करणा-या गुन्ह्यात २ वर्षे ३ महिन्यापासून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगारास लोणीकंद सायबर तपास पथकाने अटक केली.सचिन बाळू वारघडे रा.ढेरंगेवस्ती कोरेगाव भीमा ता.शिरूर जि.पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.लोणीकंद पोलीसांनी याबाबत दिलेल्या माहितीनूसार लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर्ड नं. लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १००२/२०२० भादवि ३०२ ,३६४ ,२०१,१२० ( ब ) ,३४ आर्म ऍक्ट ४ ( २५ ) ,महाराष्ट्र कायदा कलम ३७ ( १ ) १३५ मधील फरारी आरोपी नामे सचिन बाळू वारघडे रा.ढेरंगेवस्ती कोरेगाव भीमा ता.शिरूर जि.पुणे याचा शोध घेवून दाखल गुन्ह्यात ताब्यात घेवून समक्ष हजर करणेबाबत वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाले होते. त्याप्रमाणे लोणीकंद पोलीस स्टेशन सायबर तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुरज किरण गोरे ,पोलीस अंमलदार समीर पिलाने यांनी त्यांचे खास खब-यांना आरोपीची माहिती देवून चाकण ,आळंदी भागात रवाना केले होते. त्यावरून खास बातमीदाराकडून प्राप्त माहितीप्रमाणे सदर आरोपी हा बहूळ ता.खेड जि.पुणे याठिकाणी आपले आस्तित्व लपून राहात असलेबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झालेने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांचे आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक सुरज किरण गोरे ,पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, पोलीस अंमलदार समीर पिलाने ,सचिन चव्हाण, मल्हारी सपुरे असे बहुळ ता.खेड जि.पुणे येथे खाजगी वाहनाने जावून माहितीची शहानिशा केली असता सदर आरोपी हा बहुळ गावात अंगात केशरी रंगाचा फुल बाह्याचा शर्ट व ग्रे रंगाची फुल पॅन्ट घालून वावरत असलेचे खास बातमीदारामार्फत समजले असता पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे यांचे पथकाने बहुळ गावामध्ये सापळा लावून मिळालेल्या बातमीप्रमाणे व वर्णनाप्रमाणे इसम दिसताच शिताफीने पाठलाग करून त्यास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सचिन बाळू वारघडे वय -३० वर्षे रा.ढेरंगे वस्ती,कोरेगाव भीमा ता.शिरूर असे सांगितले. आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलीसांनी सांगितले.