लोणीकंद पोलीस तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी
पुणे :-
अग्नीशस्त्र बाळगणा-या सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकण्याची कामगिरी लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर पोलीसांनी केली.
विशाल उर्फ इशाप्पा जगन्नाथ पंदी वय – २१ वर्षे रा.जाधवराव बिल्डिंगमध्ये रामचंद्र कॉलेज जवळ ,माऊली पार्क ,बकोरी रोड पुणे असे बेड्या ठोकलेल्या आरोपीचे नाव आहे.
लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर पोलीस अंमलदार बाळासाहेब सकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार ,
दि.२८/०२/२०२३ रोजी लोणीकंद पोलीस ठाणे पुणे शहर तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी तसेच गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक स्वप्निल जाधव यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विशाल उर्फ इशाप्पा जगन्नाथ पंदी वय – २१ वर्षे रा.जाधवराव यांचे बिल्डिंगमध्ये,रामचंद्र कॉलेज जवळ ,माऊली पार्क ,बकोरी रोड पुणे हा बकोरी रोडवरील न्याती अॅलन या साईटजवळील लेबर कॅम्प समोर रोडवर उभा असून त्याचेजवळ पिस्टल आहे.लागलीच नमूद बातमीची वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना माहिती देवून त्यांचे आदेशाने तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विशाल उर्फ इशाप्पा जगन्नाथ पंदी वय – २१ वर्षे यास ताब्यात घेवून त्याची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून ३४ हजार रूपये किंमतीचे ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेले आहे.
अप्पर पोलिस आयुक्त रंजन शर्मा, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) मारूती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव ,पोलीस अंमलदार बाळासाहेब सकाटे, स्वप्निल जाधव,विनायक साळवे, कैलास साळूंके, अजित फरांदे, सागर जगताप, अमोल ढोणे,आशिष लोहार,,मल्हारी सपुरे ,सचिन चव्हाण यांनी ही कामगिरी केली.
एन टी व्ही न्यूज मराठी
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे
शिरूर जि.पुणे
8975598628
————————–