उस्मानाबाद : हिंदू-मुस्लीम धर्मीय बांधवांच्या ऐक्याचे प्रतीक असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथील हजरता सय्यदा खैरुन्नीसा रह. उर्फ सरकार नानीमाँ यांचा ४८ वा उरूस दि. २६ ते २८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत संपन्न होत आहे. उरूसनिमित्त आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन पुजारी सय्यद रिजवानउल्ला इमदादुल्लाह काझी यांनी केले आहे.
सालाबादप्रमाणे याहीवर्षी नळदुर्ग येथे हजरता सय्यदा खैरुन्नीसा रह. उर्फ सरकार नानीमाँ यांचा ४८ वा. उरूस दि. २६ फेब्रुवारी पासुन सुरू होत आहे. नानीमांचे भक्त राज्यातून पर राज्यातून मोठ्या संख्येने आहेत. गेली दोन वर्षे कोरोनामुळे हा उरूस झालेला नव्हता त्यामुळे यावर्षी उरूसनिमित्त भाविक मोठ्या संख्येने नळदुर्ग शहरात येण्याची शक्यता आहे.दि. २६ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता संदल मिरवणुक निघणार आहे. ही संदल मिरवणुक पुजारी रिजवानउल्ला काझी यांच्या घरातुन निघणार आहे त्यानंतर ही मिरवणुक ऐतिहासिक किल्ल्यातील नानीमाँ यांच्या राहत्या घरात जाऊन तेथुन ही मिरवणुक किल्ला गेट ते नानीमाँ दर्गाह पर्यंत निघणार आहे. दि.२७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वा.चिराग रोषणाई व मुंबई येथील प्रसिध्द कव्वाल आरीफ नाजा यांच्या कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. महाप्रसादाचे वाटप होऊन उरुसाची सांगता होणार आहे.उरुसनिमित्त आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन नानीमाँ दर्गाह पुजारी सय्यद रिजवानउल्ला काझी यांनी केले आहे.
प्रतिनिधी आयुब शेख
9975177475