बिअर बार पेक्षा धाब्यावर दारू पिणाऱ्यांच्या संख्येत वाढ़

सचिन बिद्री (उमरगा)

धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील उमरगा तालुका हा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर्ती भागावर वसलेला असल्याने दोन्ही राज्यातील व्यावसायिक, व्यापारी अन् ग्राहकांची इथे नेहमीच रेलचेल असते.लाखो रुपये खर्च करून, प्रसंगी कर्ज काढून,प्रशासकीय प्रक्रिया पुर्ण करून, रीतसर एखादा व्यक्ती बिअर बार व्यवसाय चालू करतो, त्यातून शासनाला महसूल भेटत असतो पण परिसरातील धाब्यावर अनधिकृतपणे राजरोसपणे सर्व प्रकारच्या दारूच्या बाटल्या सर्रासपणे विक्री होत असल्याने शासनाच्या परवाणगीने चालणाऱ्या बिअर बार चालकांवर दुष्काळाचे सावट निर्माण होत आहे.
शहरात ‘ड्राय डे’चे औचित्य साधून बेकायदा दारू विक्री करणाऱ्या धाब्यावर ग्राहकांची विशेष गर्दी दिसून येते. शहरातील वाईन शॉप सह सर्व बिअरबार बंद असताना शहर व परिसरातील काही धाबे नियमांना केराची टोपली दाखवत सजवलेले दिसून येतात. अश्या व्यवसायिकांवर संबंधित यंत्रणेकडून कारवाई होणे अपेक्षित असताना अधिकारी अश्या ठिकाणी फिरकतही नाहीत जणू त्यांचा काही अबोल इशारा तथा मुभा जणु..?


मुळात महाराष्ट्रराज्यात परमिट रूम,रेस्टॉरंट,बार,क्लब व इतर ठिकाणी दारू पिण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याचा परवाना घेण्याची गरज असते. यासाठीची वयोमर्यादा ही किमान 21 वर्षे आसून हा परवाना 1 दिवस, 1 वर्ष किंवा आजीवन मिळू शकतो.
राज्य उत्पादन शुल्क विभागाची मद्यविक्री करण्यासाठीची नियमावली ही कठोर आहे. मात्र, मद्यविक्रेते या नियमावलीचे पालन करत नाहीत,हे वास्तव आहे. कोणीही यावे आणि दारू घेऊन जावे, असा प्रकार सुरू आहे.परवाना असलेल्या व्यक्तीलाच दारू देणे बंधनकारक आहे. अन्यथा अशा विक्रेत्याला किंवा बारचालकाला २५ ते ३० हजार रुपयांचा दंड होऊ शकतो; परंतु, परवाना नसतानाही दारू पिणाऱ्यांना सर्रास दारूची विक्री केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.विशेषतः शहरातील व परिसरातील बिअरबार पेक्षा धाब्यावर अनधिकृतरित्या होणारी दारू विक्री अधिक असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. पण याचा शासनाला कसलाच नफा होत नाही कारण हे छुप्या रीतीने किंबहुना सर्व प्रकारच्या नामवंत कंपनीचे लेबल असलेल्या बनावट दारू तेही मनमर्जी तगड्या दामात विक्री करतात.

काय आहे कायदा?

परवाना नसताना मद्य बाळगणे तसेच परवाना नसलेल्यांना मद्यविक्री करणे हा गुन्हा आसून त्यामुळे मद्यविक्रेत्यांनी यासंदर्भात योग्य ती खबरदारी घ्यावी,असे कायदा सांगतो.


नियम असला तरी विचारतो कोण? ग्राहकाकडे परवाना आहे की नाही, हे पाहण्याची आणि त्यासाठी योग्य ती सोय उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विक्रेत्यांवर टाकलेली आहे. या नियमांचे कोणीही मद्यविक्रेता पालन करत नाही. एकाही मद्य विक्री दुकानात मद्य सेवन परवाना विचारला जात नसल्याचे आढळून आले,याउपर उमरगा शहर व तालुक्यातील काही धाब्यावर सर्रासपणे सर्व प्रकारची दारू अनधिकृत पणे विकली जातेय, मद्यपी बिअर बार पेक्षा धाब्यावर बसून मद्यसेवन करताना आढळून येत असताना संबंधित प्रशासकीय यंत्रणा कारवाईच्या नावावर चिरीमिरी घेऊन शांत बसतेय अशी चर्चा जनतेतून होताना दिसत आहे.याबाबत उमरगा तालुका राज्यउत्पादन शुल्क कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे विचारना केली असता श्री सुखदेव सिद्ध यांनी कारवाईचे सत्र सुरु आहे असे सांगत सध्या ते गेल्या तीन महिन्यापासून नाशिक येथे ट्रेनिंग मध्ये असल्याचे सांगितले.पण त्यांच्या जागी श्री सचिन भावंड या अधिकाऱ्यांनी फोनच उचलला नाही.

दारू पिऊन गाडी चालवल्यास…

Motor Vehicle Act नुसार मद्यपान करून वाहन चालवणे बेकायदेशीर असून हा फौजदारी गुन्हा आहे.ब्रीद ऑनलायझरवर अल्कोहोलचे प्रमाण 30 ते 60 मिलीग्राम /100 मिली पेक्षा जास्त दिसल्यास ‘drunk driving’ समजले जाते.संबंधित यंत्रणा सज्ज नसल्यानेच बरेच दुर्दैवी अपघात झाल्याच्या घटना समोर येत आहेत.यामध्ये निष्पाप लोकांचे मृत्यू झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत.अवैधरित्या(धाब्यावर) दारू विक्री बंद होणे तसेच लहान मुलांना,विद्यार्थ्यांना त्यांचे वय तथा परवाना पाहूनच दारू विक्री व्हावी अशी सुजाण नागरिकांतुन मागणी होत आहे.
कर्नाटक राज्यातून उमरगा तालुक्यात प्रवेश करताच येथील चेक पोस्ट च्या परिसरात काही हॉटेल वर सर्रासपणे अनधिकृत दारू विक्री होत असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले तर जकेकूर चौरस्ता ते औरादपाटी (गुलबर्गा)रोड लागत असलेल्या काही धाब्यावर सर्व प्रकारच्या लीकर ची विक्री होते अशी माहिती प्राप्त झाली आहे.अश्या अवैध धंद्यावर आळा आणण्यासाठी तालुक्याच्या दोन्ही टोकाला पोलीस चौकी असणे तितकेच महत्वाचे असल्याचे जागरूक नागरिकांतून वर्तविले जात आहे.

—–//—-

“लाखो रुपये खर्च करून प्रशासकीय मान्यता प्राप्त करून मोठ्या अपेक्षेने बिअर बार व्यवसाय सुरु केला पण माझ्या शेजारी असलेल्या धाब्यावर सर्व प्रकारच्या दारूच्या बाटल्या अनधिकृतपणे विक्री होत असल्याने माझा व्यवसाय बंद करण्याची वेळ आलीय. वेळीच संबंधित विभागाने अश्या अनधिकृतरित्या धाब्यावर दारू विक्री तथा मद्यपिंवर कारवाई केल्यास आम्हाबिअर बार चालकांना सहकार्य तथा शासनाच्या महसूल मध्ये भर पडेल”— इंद्रजित म्हेत्रे,हॉटेल शिवराज बार अँड रेस्टोरंट, औरादपाटी

“सर्रास,बेधडकपणे धाब्यावर होणारी मद्यविक्रीमुळे बिअर बारचालक आर्थिक संकटात सापडत आहेत,शासनाला टॅक्स भरून बिअरबर व्यवसाय करनाऱ्यावरच अडचणी येत आहेत याउलट अश्या धाब्यावाल्यांची मात्र चांदी होत आहे”— विक्रम पवार, बंजारा बिअर बार मालक,उमरगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *