उमरगा येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये नुकताच दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन व निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे, मुख्याध्यापक पद्माकर मोरे, बशीर शेख, विद्यानंद सुत्रावे उपस्थित होते. शाळेत मुख्याध्यापक म्हणून आयान मुंगले व पायल काळे यांनी काम पाहिले. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांना एक दिवस शाळा चालवण्याचा अनोखा व नाविन्यपूर्ण अनुभव मिळाला. उत्कृष्ट अध्यापक म्हणून क्रांती गायकवाड,अंजली अंतरेड्डी, अंजुमुस्ताद, भावेश चौधरी, पूजा कांबळे या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले तर भूमिका दुबे या विद्यार्थिनीचा उत्तम कामगिरीमुळे तिला बेस्ट स्टुडन्ट अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले यावेळी नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप दिला. दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला तीन हजार रुपयाचे व्हाईट बोर्ड भेट दिले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बशीर शेख, विद्यानंद सुत्रावे, बलभीम चव्हाण, सदानंद कुंभार,शिल्पा चंदनशिवे, ममता गायकवाड,अमर घोडके आणि महंमद शेख यांनी काम पाहिले.