उमरगा(सचिन बिद्री)
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला उपक्रम “करिअर कट्टा” याअंतर्गत उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्कार येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि करिअर कट्ट्याचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. संजय अस्वले यांना सोमय्या विद्या विहार विद्यापीठाचे कुलगुरू व्ही एन राजशेखर पिलाई, सचिव लेफ्टनंट जनरल जगवीर सिंग, केंद्र शासन पावर सेक्टर स्किल सेंटरचे सचिव प्रफुल्ल पाठक, कौशल्य आणि उद्योजक विकास चे सहसचिव नामदेव भोसले, केजी सोमय्या महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रज्ञा प्रभुणे आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.25 फेब्रुवारी 2023 रोजी के. जे. सोमैया, मुंबई येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती
करिअर कट्टा अंतर्गत आयएएस आपल्या भेटीला, उद्योजक आपल्या भेटीला आणि विविध कौशल्य विकास अभ्यासक्रम गेल्या वर्षभरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले. यासाठी जिल्हा पातळीवर महाविद्यालयीन समन्वयकाशी समन्वयक साधण्यासाठी कार्यरत महाराष्ट्रातील जिल्हा समन्वयकांनी वर्षभर केलेल्या कार्याबद्दल उत्कृष्ट जिल्हा समन्वयक म्हणून पुरस्कार देऊन प्रोत्साहन दिले जाते.धाराशिव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात करिअर कट्टा अंतर्गत कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रम,स्पर्धा परीक्षा तयारी आणि महत्व तसेच उद्योजकतेसाठी असणारे उपक्रम महाविद्यालयीन समन्वयकाद्वारे विद्यार्थ्यापर्यंत पोचवण्याचे कार्य जिल्हा समन्वयक म्हणून डॉ. अस्वले यांनी जिल्ह्यामध्ये केले आहे. यासाठी त्यांना महाविद्यालयीन, प्राचार्य, समन्वयक, त्याचबरोबर तालुका समन्वयक, आणि प्राचार्य प्रवर्तक डॉ. जयसिंग देशमुख, जिल्हा समन्वयक डॉक्टर नितीन पडवळ यांनी सहकार्य केले आहे त्यांच्या या यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे,उपाध्यक्ष अश्लेष मोरे, सरचिटणीस जनार्दन साठे, पद्माकरराव हराळकर, डॉ. सुभाष वाघमोडे, आणि संस्थेचे सर्व संचालक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य आदींनी अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *