मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद:बॕचतर्फे शाळेच्या रंगकामासाठी 30 हजार रुपयांची मदत

उमरगा : मार्च 1993 मध्ये उत्तीर्ण होऊन गेलेल्या जिल्हा परिषद हायस्कूल उमरग्याच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला कलर काम करण्यासाठी ₹30000 तीस हजार रुपयाचा निधी शाळेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे यांना सूपूर्द केला.शाळेमुळेच सर्व माजी विद्यार्थी संस्कारक्षम व यशस्वी झालेले आहेत शाळेमुळेच आज आम्ही आमच्या जीवनात यशस्वी होऊन वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावलेले आहे.आम्ही शाळेचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून तुरोरी केंद्राचे केंद्रप्रमुख सुशीलकुमार चौगुले,भारत विद्यालय माकणीला शिक्षक म्हणून कार्यरत असलेले रोटरीचे माजी सचिव अनिल मदनसुरे, एकुरग्याचे पोलीस पाटील महेशंकर पाटील,उमरगा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी रवी चिंचोळे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाईचाकूरचे मुख्याध्यापक संजय पवार, पुणे येथे कंपनीमध्ये कार्यरत असलेले मकरंद कुलकर्णी,माढा येथे वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या डॉ.अनिता चुंगे, सामाजिक कार्यकर्त्या लता बिराजदार, सुजाता कमलापुरे ,सविता लिंगे, शशिकांत बोराळकर, सिद्धेश्वर सुपतगावकर, श्रीशैल कडगंचे वर्षा माळी, प्रा. डॉ अनंत पाटील, डॉ किरण सोनकवडे, फारुख शेख, माजी नगरसेवक राजेंद्र उर्फ जिडा सूर्यवंशी, शिवाजी तारे, दशरथ गहेरवार परमेश्वर बोधे, जयंत गायकवाड, मनोरमा बिराजदार ,अर्चना निताळकर, शामल फुलसुंदर ,संपदा देशमुख, उमेश चिंचोळे ,विलास थोरात , विक्रम स्वामी, सचिन पाटील, अंजली अहंकारी आदीनी पुढाकार घेतला. शाळेला तीस हजार रुपयाची मदत दिली. यावेळी रवी चिंचोळे व सुशील कुमार चौगुले यांनी यापुढेही आम्ही शाळेला मदत करण्यासाठी सदैव तयार असल्याचे सांगितले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे यांनी शाळेला बाहेरून वॉटरप्रूफ कलर करण्यासाठी तीन लाख रुपयाची गरज असताना शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी व शालेय व्यवस्थापन समितीने हे काम करून सर्व जिल्ह्यात एक वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे, शाळेसाठी मदत करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *