बलसूर येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक
उमरगा : प्रतिनिधी
आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद दाखवून द्या,तसेच कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच त्यासाठी कामाला लागावे,असे आवाहन जिल्ह्याचे निरिक्षक माजी खा.जयसिंगराव गायकवाड यांनी केले.
उमरगा – लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उस्मानाबाद जिल्ह्याचे निरीक्षक माजी खा. जयसिंगराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली बलसूर येथे २६ फेब्रुवारी रोजी पार पडली.देशात वाढलेली सत्ताधाऱ्यांचे लोकशाही बुडवण्याचे करत असलेले षडयंत्र,घटनाबाह्य घडणाऱ्या अराजकता,घटना या सर्वातून देशाला वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घर घर चलो अभियान,वन बुथ टेन युथ अभियानांतर्गत तळागाळापर्यंत जाऊन जनतेच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करावा व येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद दाखवून द्यावी असे आवाहन जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक माजी खासदार, माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी या बैठकीत मार्गदर्शनपर बोलताना व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात,सामान्य नागरिक राष्ट्रवादीकडे आशेने पाहत असून,जिल्ह्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सज्ज आहे असे मत प्रा.सुरेश बिराजदार यांनी व्यक्त केले.
यावेळी दिग्विजय शिंदे,भीमा स्वामी, जिल्हा सचिव दत्ता इंगळे, महिला जिल्हा उपाध्यक्ष सुनिता पावशेरे, संचालक गोविंदराव साळुंखे, प्रकाश बोंडगे, शमशोद्दीन जमादार, जगदिश सुरवसे, धीरज बेळंबकर, खाजा मुजावर, बाबा पवार,बालाजी पाटील, रणजीत गायकवाड, सत्यनारायण जाधव, बालाजी बिराजदार,सचिन रणखांब, गजेंद्र जावळे, स्वप्निल माटे, दयानंद स्वामी, राहुल बनसोडे,बालाजी साळुंखे, विठ्ठलसिंह राजपूत,प्रताप महाराज, विजय सगर, पंचप्पा बोंडगे, महादेव नांगरे,भाग्यश्री रणदिवे,प्रदिप पाटील, पवन पाटील,नंदू भोसले,बाळू परताळे,आयुब पटेल, विनोद माने यांच्यासह उमरगा – लोहारा तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.