सावनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते भुषण कुबडे यांच्या सर्तकतेने तेलकामठीवरून कत्तल खाण्यात जाणारी गुरे ‘गौ प्रतिपालक’ बजरंगदलाच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून रोखण्यात आले यामुळे अनेक मुक्या जनावरांचे
प्राण वाचले.हकिकत अश्या प्रकारे आहे कि,भुषण कुबडे हे ‘गौ’ प्रेमी असून यांना काही गुरे एकदुसऱ्याला बांधून जंगलातून तेलकामठी दिशेने जात असल्याचे दिसले. कुबडे यांना संशय आल्याने त्यांनी गुरांचा पाठलाग केला व ही बाब त्यांनी पोलिसांना व सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितली. सामाजिक कार्य कर्त्यानी ‘गौ प्रतिपालक’ बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना सांगितली. त्यामुळे बजरंग दलाचे कार्यकर्ते हेटी मोहपा बायपासवर मोठयाप्रमाणात धडकले व त्यांना गुरांना पोलिसात नेण्यास सां. गीतले. यावर एका ईसमाने सामाजिक कार्यकर्ते भुषण कुबडे यांच्यावर चाकू काढला. यावर काही बजरंगी दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. एवढयात तेथे सावनेर पोलिस येवून घडकले. व गुरांना व त्यांना कत्तल खाण्यात नेणाऱ्या 1) सुखराम मोतीराम वरठी (70), 2) विलास शामराव चौधरी (30) वर्षे या ईसमांना सावनेर ठाण्यात आणून गुन्हा नोंदविण्यात आला. यावेळी तपा. सात त्यांनी सदर गोरे हे 3) समिर कुरेशी रा. सावनेर यांच्या मालकिचे असून त्यांनी आम्हाला खापा वरुन तेलकामठी येथे जनावरे नेण्यासाठी मजुरी दिल्याचे सांगितले, यावरून सावनेर पोलीसांनी त्यांचेकडुन 14 गोरे वेगवेगळ्या रंगाचे किंमती 70,000 /- रु. ची गुरे जप्त केली व त्यांची पशु वैद्यकिय दवाखाना सावनेर यांचे मार्फतीने घटनास्थळी वैद्यकिय तपासणी केली व त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने जयकृष्ण गौसंरक्षण संस्था भगवान गोडेगाव ता. नरखेड येथे पाठविले आहे. यात राष्ट्रीय बजरंग दल शाखा सावनेर चे अध्यक्ष हिमांशु देवानद बटोले, 1) प्रतिक उर्फ लारा भुमेश्वर खोरगडे, सुधिर बिहोने, युगांत ठाकुर, अमित महाजन, आकाश टिक्कम, श्रीकांत गमे यांनी मोलाचे सहकार्य केले.
मंगेश उराडे नागपुर