नागपुर,सावनेर : प्रख्यात हिंदी चित्रपट कलावंत व माजीखासदार राज बब्बर यांनी १ मार्चला तालुक्यातील सुफी संत ताजुद्दीन वाकी दरगाह येथे दुपारी तीन वाजताच्या सुमारास भेट दिली. दर्ग्यावर चादर चढवून शांतता, समृद्धीसाठी प्रार्थना केली. ट्रस्टच्या वतीने राज बब्बर व सय्यद अफसर अली निजामी चेअरमन ऑफ शरीफ हजरत निजामुद्दीन दर्गा दिल्ली यांचे सुफी संत बाबा ताजुद्दीन दर्गा कमिटी अध्यक्ष प्रभाकर डहाके,सचिव ज्ञानेश्वर डहाके यांनी स्वागत केले. राज बब्बर हे खासदार होण्यापूर्वी वाकी येथे दर्शनासाठी आले. दर्शनानंतर काँग्रेस पक्षाकडून खासदारकी लढले आणि त्यात ते विजयी झाले. तेव्हापासून ताजुद्दीन बाबांच्या दर्शनासाठी येतात. दरवर्षी येथे येऊन चादर चढवितात. दरम्यान, त्यांनी उपस्थित प्रशासना कडून आढावा घेतला.यावेळी तहसीलदार प्रताप वाघमारे, नायब तहसीलदार संदीप दाबेराव, जयसिंग राठोड,खापा पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनोज खडसे, (वलनी) सरपंच अरविंद गजभिये व इतरांची उपस्थिती होती.
मंगेश उराडे नागपुर