लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे तक्रारदार यांनी समक्ष येवून तक्रार नोंद केली की, तक्रारदार यांचे मालकीचा प्लॉट क्र. १ वंगरवाडी, एकात्मता नगर, डिगडोह येथे असून तक्रारदार यांनी त्या प्लॉटचा गाव नकाशाची तलाठी कार्यालय, डिगडोह ता. हिंगणा येथील कोतवाल श्री चंद्रशेखर दिवाणजी पारधी रा. निलडोह पोस्टे एमआयडीसी नागपूर यांचेकडे मागणी केली असता श्री चंद्रशेखर पारधी तक्रारदारास गाव नकाशा देण्याच्या मोबदल्यात तक्रारदारास ५०००/- रू. लाचेची मागणी करून स्वतः स्विकारण्याची तयारी दर्शविल्याने उपरोक्त आलोसे विरूद्ध सापळा कारवाईचे आयोजन केले असता दिनांक ०२/०३/२०२३ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर चे पथकाने कोतवाल श्री चंद्रशेखर पारधी यांना तक्रारदार यांचेकडून लाच रक्कम ५०००/- रू. आय. सी. चौक, हिंगणा रोड येथे स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले.
नमुद आलोसे यांनी आपले लोकसेवक पदाचा दुरूपयोग करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता
लाच रकमेची मागणी करून स्वतः स्विकारल्याने त्यांचे विरूध्द पोलीस स्टेशन एम.आय.डी.सी. नागपूर
शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून उपरोक्त आलोसे
यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई श्री. राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर, श्री. मधुकर गिते, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक श्रीमती अनामिका मिर्झापुरे, पोलीस निरीक्षक प्रविण लाकडे, पोलीस निरीक्षक श्रीमती प्रिती शेंन्डे,, नापोशि सारंग बालपांडे, मनापोशि गिता चौधरी, करूणा सहारे, दिपाली भगत, चामपोशि हर्शलता भरडकर यांनी केलेली आहे.
प्रतिनिधी विनोद गोडबोले नागपूर