लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रारदार यांनी समक्ष येवून तक्रार नोंद केली की, तक्रारदार हे शिक्षक असून ते प्रकृती ठिक नसल्याने माहे डिसेंबर २०२२ व जानेवारी २०२३ मध्ये वैद्यकीय रजेवर होते. प्रकृती ठिक झाल्यावर ते जानेवारी २०२३ मध्ये हजर झाले परंतु या वैद्यकीय कालावधीतील त्यांचा पगार काढण्यात आला नसल्याने त्यांनी वैद्यकीय रजा मंजुर करून या कालावधीतील पगार काढण्याकरिता गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती तिरोडा यांचेकडे कागदपत्रासह अर्ज केला होता. परंतु त्यांनी वैद्यकीय रजा मंजुर करून पगार काढला नाही. आलोसे धनपाल श्रीराम पटले पद केंद्रप्रमुख / विषय शिक्षक केंन्द्र – गांगला, पंचायत समिती तिरोडा, ता. तिरोडा जि. गोंदिया यांनी तक्रारदारास गटशिक्षण अधिकारी यांचेकडून त्यांची वैद्यकीय रजा मंजुर करून त्या कालावधीतील पगार काढून देणेकरीता तक्रारदारास १०,०००/- रू. लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती ९,०००/- रू. लाच रक्कम आज दिनांक ०३/०२/२०२३ रोजी जिल्हा परिषद केंन्द्र प्राथमिक शाळा, गांगला येथे स्वतः स्विकारली.
नमुद आलोसे यांनी आपले लोकसेवक पदाचा दुरूपयोग करून स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता लाच रकमेची मागणी करून स्वतः स्विकारल्याने त्यांचे विरूध्द पोलीस स्टेशन तिरोडा जि. गोंदिया येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात येत असून उपरोक्त आलोसे यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
प्रतिनिधी विनोद गोडबोले नागपूर