विद्यार्थी व पालकांनी नाराजी व्यक्त करीत केली चौकशीची मागणी
नागपुर: सावनेर जवळच असलेल्या खापा रोड वरील के. जॉन पब्लीक स्कुल येथे 10 वी सीबीएसई च्या विद्यार्थ्यांना प्रश्न पत्रीका वाटपात घोळ करण्यात आल्याने विद्यार्थ्यांत नाराजी
असून पालकांनी याची तक्रार करीत चौकशीची मागणी केली आहे. लकाने केलेल्या तक्रारी नुसार ईयत्ता 10 वी सीबीएसई अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सावनेर येथील के. जॉन पब्लीक स्कुल हे सेंटर देण्यात आले. शनिवार दि. 4 रोजी विज्ञानाच्या पेपरच्यावेळी सकाळी 10:15 वाजता या सेंटर वरील रूम नं 7 मध्ये एका बेंचवर 2 मुले बसविण्यात आली.
सीबीएसई पॅर्टन मधे प्रश्न पत्रीकेचे 3 सेट असतात. या के.जॉन शाळेतील एका शिक्षीकेने रूम नं 7 मधील सर्व विद्यार्थ्यांना पहील्या सेट मधल्या सर्व प्रश्नपत्रीका विद्यार्थ्यांना वाटल्या.
प्रश्नपत्रीका वाटल्यानंतर 15 मिनीटे वाचनाकरीता दिली जातात. त्यानंतर 10:30 ला पेपर सोडविण्यास सुरूवात होते. परंतू पेपर वाटल्यानंतर हे पेपर चुकीचे वाटण्यात आल्याचे सांगून त्या शिक्षीकेने ते सर्व वाटलेले पेपर विद्यार्थ्यांकडून परत घेतले. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यावर टिकमार्क केल्याचे शिक्षीकेला सांगितले. यावर त्या शिक्षीकेने ‘काही होत नाही दुसऱ्याच्या कामात येईल’ असे म्हणाली व त्यानंतर दुसऱ्या सेटचे पेपर वाटले. काही वेळाने तेही चुकीचे वाटल्याचे सांगून वाटलेले पेपर परत घेतले व पुन्हा तीसऱ्या सेटचे पेपर वाटले. यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली असून ही बाब आपल्या पालकांना सांगीतली पालकांनी याची तक्रार पत्रकारांना केली. प्रश्नपत्रीकेच्या वाटाघाटीत झालेल्या घोळाने विद्यार्थ्यांना वाचना करीता मिळालेली 15 मिनीटे वाया गेली असून वाटलेल्या सर्व प्रश्नपत्रीका बरोबर वाटण्यात आल्या की, पुन्हा वाटतांना घोळ करण्यात आला ? याबद्दल पालकांनी शंका उपस्थित केली आहे. याबाबत त्या शिक्षीकेविरूद्ध योग्य चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.
मंगेश उराडे