प्रशिक्षनाला ७५ शेतकरी उपस्थित होते
नागपुर प्रतिनिधि: शेतकऱ्यांनी शेतामध्ये रासायनिक खतांचा वापर टाळावा व जैविक शेती आत्मसात करावी त्यामुळे शेतकरी निर्यातक्षम माल तयार करून व कमी खर्चात जास्तीत जास्त अधिक नफा मिळवू शकेल व त्यामुळे शेतकऱ्याचा आणि ग्रामीण भागाचा विकास शक्य होईल असे प्रतिपादन प्रा. डॉ. अनिल भिकाने, संचालक, विस्तार शिक्षण संचनालय, मपमविवी यांनी “शेतकरी उत्पादक कंपनी संचालक मंडळ” व “आयात निर्यात व्यवस्थापन” प्रशिक्षणाच्या निरोप समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केले. ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी मिळून एकमेकांच्या हितासाठी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून संचालक मंडळ सह सभासदांना जास्तीत जास्त फायदा होईल असा उद्देश ठेवून कार्य करायला हवे. व याच उत्पादक कंपनीच्या मदतीने जास्तीत जास्त माल इतर देश्यात निर्यात करण्याचा प्रयत्न करावा.महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, दुधबर्डी, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि वनस्पती मंडळ, पुणे आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “शेतकरी उत्पादक कंपनी संचालक मंडळ” व “आयात निर्यात व्यवस्थापन” यावर प्रशिक्षण कार्यक्रम दि. ०१ ते ०३ मार्च २०२३ दरम्यान शेतकरी भवन, विस्तार शिक्षण संचनालय मपमविवि, नागपुर येथे डॉ. सारीपुत लांडगे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.याप्र-संगी व्यासपीठावर डॉ. सारीपुत लांडगे, आयोजक तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, दुधबर्डी, नागपूर, डी. एम. साबळे, विभाग प्रमुख (प्रशिक्षण) एमसीडीसी, पुणे, डॉ. दिलीप डी. वैरागडे, माजी अधिष्ठाता वाणिज्य विद्याशाखा, नागपूर विद्यापीठ, नागपूर, कमलेश चांदेवार, प्रशिक्षण समन्वयक, विषय विशेषज्ञ ( कृषिविद्यान) मयूर पवार, प्रशिक्षण समन्वयक, एमसीडीसी हे उपस्थित होते.सहभागी प्रशिक्षणार्थी सौरभ डांगरे यांनी अभिप्रायात तरुण पिढीने शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून शेतीला कार्पोरेट स्वरूप देऊन आधुनिकीकरण करण्यात सहभागी झाले पाहिजे असे ते म्हणाले. त्याच बरोबर प्राजक्ता लांजेवार यांनी आयात निर्यात प्रशिक्षण अतिशय महत्व असून त्यामुळे शेतकरी शेतामध्ये झालेले उत्पादन निर्यात करून जास्त प्रमाणात नफा मिळवू शकतो असे प्रतिपादन त्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर पवार यांनी तर आभार पूजा वासाडे यांनी मानले. शेतकरी उत्पादक कंपनी संचालक मंडळ याप्रशिक्षणाला १५ आणि आयात निर्यात व्यवस्थापन या प्रशिक्षणाला ६० असे एकून ७५ शेतकरी उपस्थित होते. या
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहन कापसे व प्रेरणा सोमनाथे यांनी परिश्रम घेतले. शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत निर्यातक्षम माल तयार केल्यास ग्रामीण भागाचा विकास होण्यास मदत होईल.
प्रा.डॉ. अनिल भिकाने
संचालक, विस्तार शिक्षण म.प.म.वि.वि. नागपूर
मंगेश उराडे विशेष प्रतिनिधि नागपूर