उमरगा प्रतिनिधी: तालुक्यातील आष्टा जहागीर येथे जगद्गुरु तुकाराम महाराज बिज उत्सव उत्साहात साजरी करण्यात आला.यावेळी आष्टा जहागीर येथील संतयोगी दामोदर मठ संस्थांचे मठाधिपती श्री श्री श्री १००८ महंत अवधूतपूरी महाराज यांचे गुरुवार दि९ रोजी बिज उत्सवानिमित्त कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी महंत अवधूतपूरी महाराज आपल्या कीर्तन सेवेतून बोलताना म्हणाले की,जगद्गुरु तुकाराम महाराजांची भक्ती प्रबळ होती.४२वर्ष तुकोबांरायांनी परमार्थ चालविला.तुकोबांरायांच्या काळातील प्रस्थापितांनी तुकोबांची गाथा नदीपात्रात बुडविला परंतु गाथा बुडली नाही, भगवान परमात्म्यांनी बाल वेश घेऊन गाथा बुडु दिला नसुन तो गाथा तारला गेला.रामेश्वर भट्ट तुकोबारायांचे कट्टेर विरोधक होते. त्यांने जिवनभर त्रास दिला.प्रत्येक घरा घरात तुकोबांचा गाथा वाचला पाहिजे त्यांने संकष्ठ सरुन काळ पाठीमागे लागत नाही.ती गाथा नसुन महामंत्र आहे.

काळाचा संघ केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. परंतू तुकाराम महाराजांनी काळाला पुढे करुन परमार्थ केला.
तरुणांनाणी व्यसनापसून दुर राहून परमार्थ केल्यास प्रगती होईल असे मत महंत अवधूतपूरी महाराज यांनी //तुकाराम तुकाराम,नाम घेता कापे यम//या अभंगांचे निरुपण करतांना भाविक भक्तांच्या संबोधित होते.
यावेळी भजनीमंळचे अध्यक्ष कमलाकर गायकवाड,प्रा.सचिन गायकवाड, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष तुकाराम गायकवाड,माजी अध्यक्ष अशोकराव गायकवाड, भजनीमंळचे हिरानाथ गायकवाड, रमेश गायकवाड,भागवत जाधव,अबादास पाटील,भागवत जाधव, सोनाजी जाधव,विश्वंभर जाधव, पांडुरंग गायकवाड,अण्णाराव गायकवाड,अशोक साळुंखे,मोहन कांबळे,बसवराज कांबळे,अरुण कांबळे, अरुण कांबळे,व्यंकट गायकवाड,रोहिदास कांबळे,प्राताप कांबळे,शिवाजी कांबळे,माधव पाटील,राजेंद पाटील,आदिसह पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.