(सचिन बिद्री:उमरगा)
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ओळखली जाणारी भारतीय स्टेट बँकेच्या उमरगा शाखेची सर्व सूत्रे पहिल्यांदाच महिलेच्या हाती आल्याने बँकेच्या सेवेत अधिक तत्परता व नियोजनबद्ध कार्यप्रणाली सर्व ग्राहकांना अनुभवास भेटत आहे. उमरगा एस बी आय शाखेच्या इतिहासात पहिल्यांदाच बँकेला शीतल रासकर रुपाने महिला शाखाधिकारी लाभल्या आहेत. तसं पाहायल्या गेलं तर पुर्ण रिजन मध्ये शीतल किरण रासकर या एकमेव महिला शाखाधिकारी असल्याचे दिसून येते.
सौ शीतल यांचं शिक्षण जेजुरी येथील शाळेत झाले असून दहावी बोर्डात वर्गातून सर्वाधिक गुण (SSC-84%)मिळवून विद्यार्थीदशेतच परिसरात आपल्या आईवडिलांचे नावलौकिक केले होते. महाविद्यालयिन शिक्षण बारामती येथील शारदाबाई पवार महाविद्यालय नंतर पदवी व पदवीत्तर शिक्षण शिवाजीनगर पुणे येथील कॉलेज ऑफ अग्रीकल्चर येथे झाले. वडील बँकिंग क्षेत्रात कार्यरत असल्याने शितलला पण बँकिंग क्षेत्राशी आवड निर्माण झाली आणि जिथे आवड त्यातच करिअर असा ध्यास बाळगून एम पी एस सी च्या तयारी करू लागली आणि एकाएकी एस बी आय बँकेच्या स्पर्धा परीक्षाचा अर्ज भरला आणि पहिल्याच प्रयत्नात मे 2008 मध्ये त्या एस बी आय फलटन मेन ब्रँच मध्ये असिस्टंट ब्रँच मॅनेजर च्या पदावर रुजू झाल्या.जॉब करत असताना अभ्यासाची गोडी वा सातत्य कायम तसाच राहिला त्यामुळे डिपार्टमेंटल परीक्षेत घवघवीत यश संपादन करत 2021 साली सांगली एस बी आय शाखेत शाखाधिकारी पदावर रुजू झाल्या. आपल्या अनोख्या रीतीने ग्राहकांशी संवाद आणि तत्पर सेवेमुळे त्या ओळखल्या जाऊ लागल्या. सांगली नंतर आता सौ शितल यांनी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शाखेची धुरा सांभाळली असून, अगदी सुटसुटीत व कार्यत्परता काय असते..? हे उमरगा शहर व परिसरातील एस बी आय खातेधारकांना निदर्शनास व अनुभवास भेटत आहे.
देशातील सर्वात मोठी पब्लिक सेक्टर बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक. स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक देशातील सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रात सर्वात आघाडीची बँक असून बँक ऑफ कलकत्ता म्हणून ती १८०६ मध्ये अस्तित्वात आली. यानंतर १८४० मध्ये अस्तित्वात आलेल्या बँक ऑफ बॉम्बे आणि १८४३ मधील बँक ऑफ मद्रास यांचे एकत्रीकरण करून १९२१ मध्ये इम्पीरिअल बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आणली. तेव्हा तिचे मुख्यालय कलकत्ता (आताचे कोलकाता) येथे होते. १९५५ मध्ये तिचे राष्ट्रीयीकरण होऊन मुंबईतील मुख्यालयासह नावही स्टेट बँक ऑफ इंडिया करण्यात आले.
मुलगा मुलगी एकसमान हीच शिकवण
शितल च्या आई-वडिलांना दोन मुलीच.आम्हाला मुलगा नाही असे विचार कधी शितल च्या पालकांना पडलाच नाही. मुलगा मुलगी एकसमान अशी विचारसरणी घरातूनच असल्याने घरात शिक्षणाला अधिक महत्व दिले जायचे. घरातील शैक्षणिक पोषक वातावरण व संस्काराचे बिजरोपण होत असल्याने सौ शितल व बहीण सौ दीपाली या दोघेही उच्चशिक्षित होऊन आपले ध्येय गाठल्या. शितल ची बहीण सौ दीपाली सचिन नेवसे ह्या पुण्यातील एका कंपनीत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन अभियंता पदावर कार्यरत आहे.
आजच्या या आधुनिक काळातही बऱ्याच कुटुंबात मुलांच्या तुलनेत मुलींना कमी लेखलं जातं,आर्थिक बिकट परिस्थितीचा हवाला देत अनेक पालक मुलींना त्यांचे शिक्षण सोडून विवाह रचताना दिसतात. चूल आणि मुल या पलीकडे विश्व खुप मोठा आहे कदाचित याचे भान विसरून जातात. पण शाखाधिकारी सौ शितल यांच्याकडे पाहून मुलींना व मुलींच्या पालकांना नक्कीच नवी दिशा नवी ऊर्जा भेटेल आणि आत्मविश्वास निर्माण होईल हीच अपेक्षा.
–//–//–//–
“जिथे इच्छा तेथे मार्ग या तत्वावर मी लहानपणापासूनच अभ्यास करत आले. शाळेत असतानाच एका मोठ्या बँकेची मॅनेजर बनन्याचे ध्येय स्वप्न मी बाळगले होते.बँकेत शाखाधिकारी म्हणून मी काम पाहताना ग्राहकांच्या सेवेला मी अधिक प्राधान्य देत आले. ग्राहकांचे शंका निरसन करून तत्पर सेवा देण्यावर अधिक भर दिला जातो, मला कामाचा कंटाळा कधीच येत नाही, मी माझ्या बँकेच्या कामाला स्वतःला वाहून दिले आहे.बँकिंग क्षेत्रातील माझ्या यशामागे माझे सासू सासरे आणि मिस्टरांचा खुप मोठा योगदान आहे.त्यांच्या प्रेरणेमुळे आणि सहकार्यामुळेच मी पुर्ण वेळ एस बी आय बँकेला देऊ शकते”– सौ शितल किरण रासकर, शाखाधिकारी, एस बी आय, उमरगा ब्रँच