अहमदनगर : श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने शहरातील एक वकील त्रास देत असल्याचे कारण सांगत आता जगण्याची इच्छा नसल्याचे पत्र लिहून जीवाचे बरेवाईट झाल्यास संबंधित वकील जबाबदार असल्याचे पत्र आपल्या सहकाऱ्याच्या मोबाईलवर टाकले. त्यानंतर मोबाईल बंद करून तो पोलीस कर्मचारी गायब झाला आहे. रात्री उशिरापर्यंत त्या कर्मचाऱ्याचा शोध लागला नव्हता.
या पोलीस कर्मचाऱ्याचे शहरातील एका नामांकित वकिलाशी सोमवारी (ता.२७) गुन्हा दाखल करण्यावरून मतभेद झाले. या गोष्टीमुळे नाराज झालेल्या वकिलांनी त्याचे विरुद्ध आझाद मैदान येथे उपोषण करणार असल्याचे लेखी निवेदन दिले. तसेच त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कार्यकाळातील सर्व माहिती मागितली. यामुळे दबावात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने आपला सहकारी असलेल्या पोलीस अमलदाराला लेखी पत्र लिहून त्या पत्रात वकिलाने विनाकारण मानसिक त्रास देत असल्याचे म्हटले आहे.