अनुचित प्रकारावर राहील आता त्या’ व्हिडिओ शूटिंग कॅमेऱ्याची करडी नजर

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलीस स्टेशन मध्ये आज आगामी सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच शोभायात्रा व इतर कार्यक्रमांमध्ये पोलिसांची करडी नजर असावी याकरिता अत्याधुनिक व्हिडिओ शूटिंग कॅमेरा प्राप्त झाला आहे या कॅमेऱ्याची रेंज जवळपास एक किलोमीटर असून यामध्ये डिजिटल पद्धतीच्या सेटिंग उपलब्ध करून दिल्या आहे यामुळे शहरात घडणाऱ्या अनुचित प्रकाराला आता चांगलाच आळा बसणार आहे.


मलकापूर शहरांमध्ये आज रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठी शोभायात्रा निघणार आहे. तसेच मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून मुस्लिम बांधवांचे सुद्धा रोज विविध कार्यक्रम आयोजित केले जातात तसेच शहरांमध्ये रोजच वेगवेगळे कार्यक्रम सुरू असतात तर काही ठिकाणी अनुचित प्रकारही घडतो यामुळे पोलिसांना नाहक त्रास सहन करावा लागतो याकरिता बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या प्रयत्नातून मलकापूर शहर पोलीस स्टेशनला हा अत्याधुनिक व्हिडिओ शूटिंग कॅमेरा मिळाला आहे.

चौकट
मलकापूर शहरातील नागरिकांना कळविण्यात येते की मलकापूर शहर पोलीस स्टेशनला हा अत्याधुनिक कॅमेरा प्राप्त झाला आहे या कॅमेऱ्याची आता अनुचित प्रकारावर चांगलीच नजर असणार आहे. तसेच कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच पोलिसांना सहकार्य करावे व कायद्याचे पालन करावे.

अशोक रत्नपारखी
मलकापूर शहर पोलीस निरीक्षक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *