दिपक चांभारे पाटील यांच्यावर सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव.!
मलकापूर : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील यांच्या झालेल्या वाढदिवसाला सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल बघायला मिळाली. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, सहकार, युवक, विद्यार्थी यांसह सर्वस्तरातुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.
शाळेच्या विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. तसेच विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांना दिपक पाटील यांनी भेटी दिल्या. आळंद येथे शिवसेनेच्या शाखेचे पुनर्गठन करण्यात आले. तसेच इतर गावांमध्ये शिवसेनेच्या शाखेचे उदघाटन करण्यात आले. समाजातील गरजवंतांना, दुःखी, कष्टी लोकांना मदतीचा हात देण्यात आला. मलकापूर विधानसभेचे लोकप्रीय कर्तव्यदक्ष आमदार मा. राजेशजी एकडे, शिवसेना जिल्हाप्रमुख मा. वसंतराव भोजने, भा.रा.कॉ. चे ज्येष्ठ नेते डॉ. अरविंदजी कोलते, रा. कॉ. जिल्हाध्यक्ष मा. श्री. संतोषभाऊ रायपुरे तथा सहकार क्षेत्राचे महामेरू राजर्षी शाहू मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके, सां. बा. विभागाचे उपअभियंता श्री. सचिनजी तायडे यांच्यासह विविध शासकिय, निमशासकीय तथा खाजगी क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. तसेच शिवसेनेचे, महाविकास आघाडी, सर्वपक्षिय पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक, राजकीय, उद्योग, सहकार क्षेत्रात दिपक पाटील हे नाव परिचित आहे. अल्पवधीत त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली आहे. एखादा विषय हाती घेतला म्हणजे शेवटाला नेण्याचा त्यांचा स्वभाव आहे. अडल्या नडल्यासाठी ते सदैव धावून येतात. कार्यकर्ते जपणे, त्यांचा उत्साह वाढवणे, संघटन मजबुत करणे याकडे दिपक पाटील यांचे लक्ष असते. त्यांच्या नेतृत्वात मलकापूर तालुक्यात शिवसेनेची मजबूत फळी निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाला कार्यक्रमांची भक्कम रेलचेल बघायला मिळाली.
युवा नेतृत्व म्हणून दिपक पाटील जनमानसांत लोकप्रिय आहेत. राजकारणाचा वारसा नसतांना त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सर्वांशी चांगले बोलणे, चांगले वागणे यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. तळागाळातील कार्यकर्त्यांशी ते सतत संवाद साधतात. त्यामुळे सर्वांना ते आपले वाटतात. त्यांच्या वाढदिवसाला त्यांच्यावर झालेला शुभेच्छांचा वर्षाव या गोष्टीची प्रचिती देऊन गेला.