औरंगाबाद
सोयगाव तालुक्यातील घाणेगाव तांडा , मुर्ती ( चारु ), घाणेगाव हे तीन गाव मिळुन गृप ग्रामपंचायत असुन घाणेगाव तांडा येथे ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. रत्नाबाई सुरेश चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहन करुन महाराष्ट्र दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण आजच्या दिवशी केले जाते.
१ मे १९६० रोजी अनेक राज्याच्या विभाजनापासून महाराष्ट्र राज्य स्थापन केले गेले. १ मे रोजी म्हणजेच आजच्या दिवशी महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. शिवाय हा दिवस जागतिक कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो.
महाराष्ट्र दिनी ध्वजारोहन करुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या ध्वजारोहन कार्यक्रमाला सौ. रत्नाबाई सुरेश चव्हाण , सामाजिक कार्यकर्ते सुरेश चव्हाण , हिरा जाधव, भागचंद राठोड, ताराचंद पवार, ग्रामसेवक रणसिंग, व अंगणवाडी सेविका , तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते
प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद