नवी मुंबई महानगरपालिकेचे नावं आणि बोधचिन्ह वापरून नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 15 ते 18 च्या उद्यानात अश्लील भाषेचा वापर करुन बॅनर लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नवी मुंबई महानगरपालिके कडून सदर बॅनर काढून टाकण्यात आला असून कोपरखैरणे पोलीस ठाण्यात बॅनर लावणाऱ्या अज्ञात इसमा विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.