तुळजापूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण करणार्या सई भोरे-पाटील यांची अकलुजच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी नेमणूक झाली आहे.”सदरक्षणाय खलनिग्रहणाय”म्हणजेच सज्जनांचे रक्षण व दुर्जनांचे निर्दालन या पोलीस खात्याच्या ब्रीद वाक्याला अणुसरुन सई भोरे-पाटील यांनी तुळजापूर तालुक्यात आपली नौकरी बजावली असल्याने त्या उस्मानाबाद जिल्ह्यात अल्पावधीतच लोकप्रिय ठरल्या होत्या.
कायदा आणि सविस्तर अबाधित राखण्यासाठी त्यांनी अनेक कठोर पावले उचलून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.
पारधी व काही बंजारा समाज अवैधरीत्या दारू बनवतात त्या समाजातील व्यक्ती गुन्हेगारीकडे कोणत्या कारणामुळे वळाल्या, त्यांची कौटुंबिक पार्श्वभुमी, शिक्षण आर्थिक पुनर्वसन करण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि काही ठिकाणी यश देखील प्राप्त झाले..
गुंड प्रवृत्तीच्या गुंडांना चांगलाच धडा शिकवला होता अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले होते.. तालुक्यातील विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी मार्गदर्शन करून शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले .लेडी सिंघम ऑफिसर म्हणून तुळजापूर तालुक्यात ओळख निर्माण केले होते
त्यांनंतर तेथून त्यांची सध्या अकलुज येथे नेमणुक झाली आहे.
उस्मानाबाद पोलीस अधिक्षक, अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक . नवनीत कॉवत
पुढील शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक करत सत्कार केले
प्रतिनिधी (आयुब शेख )