विनोद गंगणे यांच्या प्रयत्नाला यश
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या
तीर्थक्षेत्र तुळजापुरात विविध विकासकामांसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकारातून १७२ कोटींची निधी मंजूर झाला आहे. यात शहरातील ४० रस्त्यांच्या कामांसाठी १५८ कोटी ५२ लाख रुपये तर सुरेख स्मृती येथे अद्ययावत भक्त निवास, मंगल कार्यालय बांधकामासाठी दीड कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती युवक नेते विनोद गंगणे यांनी दिली
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी मंजूर केल्याचे विनोद गंगणे यांनी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, पुजारी दीड कोटी: मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, पंडितराव जगदाळे, अमर हंगरगेकर, शांताराम पेंदे, आनंद कंदले, गणेश भिंगारे उपस्थित होते.
सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत शहरातील विविध ४० विकास आराखड्यातील
नगरपालिकेच्या विकासकामांसाठी रस्त्यांच्या विकासासाठी १५८.५२ विविध योजनांच्या माध्यमातून कोटी, परिक्षेत्र विकास निधीतून हद्दवाढ भागातील रस्ते विकासासाठी ६ कोटी रुपये तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ५.९४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. या निधीमुळे मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या शहरातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
सुरेख स्मृतीच्या विकासासाठी
शहरातील सुरेख स्मृती रेस्ट हाऊसची दुरावस्था झाली असून या ठिकाणी विविध सोयी सुविधांसह अद्ययावत भक्त निवास, मंगल रखडलेले रस्ते लागणार मार्गी: कार्यालय, मोठा हॉल बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी एक कोटी ४० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.
शहरवासी विकासाच्या वाटचालीने शहर जात असल्याने विनोद गंगणे विकास कामाचं कौतुक करत आहेत
प्रतिनिधी (आयुब शेख )