सामाजिक कार्यकर्ते शेख मिश्रा व आ.राजेंश एकडे यांची तत्परता..

बुलडाणा : जिल्ह्यातील मलकापूर येथील रहिवासी असलेल्या एका महिलेचा अकोला सर्वोपच्चार रुग्णालयात ब्रेन हॅमरिंगच्या उपचारासाठी भरती करण्यात आले होते . परंतु सर्वोपचारमध्ये न्युरो सर्जन उपलब्ध नसल्याने महिला नागपूर येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आल्या नंतर नागपूरला जाण्यासाठी व इलाजासाठी पैसे नसल्याने ४ सप्टेंबर रोजी या महिलेची चिमुकली मुलगी आईच्या उपचारासाठी डिस्चार्ज सर्टीफिकेट घेऊन रुग्णालयाच्या परिसरात मदत मागू लागली . आईचा जीव वाचविण्यासाठी चिमुकलीची ही धडपड पाहून सामाजिक कार्यकर्ते शेरु मिश्रा यांनी अत्यंत महत्वाची कामगिरी करून या महिलेला नागपूर पर्यंत पोहचवून उपचाराची व्यवस्था केली . १ सप्टेंबर रोजी मलकापूर येथील रहिवासी सौ.पायल कृष्णा चोपडे यांना तेथील ग्रामीण रुग्णालयातून उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले.ब्रेन हॅमरिंगमुळे पायल चोपडे यांची प्रकृती गंभीर होती व त्यांना खुप त्रास होत होता .१ सप्टेंबर रोजी सर्वोपचारमध्ये भरती केल्यानंतर पती कृष्णा चोपडे व छोटी मुलगी सोबत होती.सर्वोपचारमध्ये उपचार होईल अशी पती व मुलीला अपेक्षा होती परंतु न्युरो सर्जन उपलब्ध नसल्याने या महिलेला उपचारासाठी नागरपूरला घेवून जाण्याचा सल्ला देण्यात आला.तेव्हा नागपूर जाण्यासाठी आणि उपचारासाठी पैसे नसल्याने पैश्याची सोय करण्यासाठी पती निघुन गेला . परंतु इकडे महिलेला रुग्णालयाने डिस्चार्ज दिला होता . महिलेसोबत छोटी मुलगी असल्याने तिला आपल्या आईच्या वेदना पहावल्या नाहीत . या छोट्या चिमुल्या मुलीने आपल्या आईचे डिस्चार्ज सर्टीफिकेट घेऊन आईच्या उपचारासाठी नागपूरला जाण्यासाठी रुग्णालयाच्या परिसरात मदत मागायला सुरूवात केली .

हातात डिस्चार्ज सर्टीफिकेट घेऊन लोकांना मदत मागणारी ही चिमुकली सामाजिक कार्यकर्ते शेरु मिश्रा यांच्या नजरेस पडली . तेव्हा त्यांनी या चिमुकलीची विचारपूस केली.चिमुकलीने हकिकत सांगितल्यानंतर शेरु मिश्रा यांनी परिस्थितीचे गांभिर्य ओळखले . त्यांनी ताबडतोब मलकापूर मतदार संघाचे आमदार राजेंद्र एकडे यांच्याशी संपर्क केला . आमदारांनी सुद्धा परिस्थितीचे गांभीर्य ओळखले व तात्काळ त्या महिलेला नागपूरला पोहचविण्यासाठी मलकापूरहून अॅब्युलन्स पाठविली.शेरु मिश्रा यांनी आपल्या मित्रांकडून अकोल्यातून काही मदत महिलेच्या उपचारासाठी जमा केली.महिलेची आई वर्धा येथे राहत होती.त्यांनाही महिलेसोबत नागपूरला जाण्यासाठी बोलाविण्यात आले.शेरु मिश्रा यांनी गोळा केलेली मदत व आमदार राजेंद्र एकडे यांनी पाठविलेले अॅब्युलन्ससह सौ . पायल कृष्णा चोपडे यांना नागपूरला उपचारासाठी ४ सप्टेंबरच्या रात्री रवाणा करण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते शेरु मिश्रा आणि आमदार राजेंद्र एकडे यांनी दाखविलेली तत्परता व समय सुचकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *