बुलढाणा : सामाजिक , शैक्षणिक . क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीमुळे मलकापूर न.प.चे उपाध्यक्ष हाजी रशिदखाँ जमादार यांची कर्नाटक , महाराष्ट्र , गोवा राज्यातील आंतरराज्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे . मुस्लीम समाजातील तरुणांना व युवतींना शिक्षणाची ओढ निर्माण करणारे , गेल्या ४०-४५ वर्षापासून मासुमिया एज्युकेशन सोसायटी , झेड.ए.उर्दू हायस्कुल , राबीया उर्दू गर्ल्स स्कुलचे अध्यक्ष पद सांभाळत मलकापूर व परिसरात शैक्षणिक क्रांती निर्माण करणारे तसेच समाजकारण व राजकारणाच्या माध्यमातून समाज जागृती करून विविध विकासात्मक व सामाजिक उपयोगी कामे करणारे न.प.चे माजी अध्यक्ष तथा विद्यमान उपाध्यक्ष हाजी रशिदखाँ जमादार यांना बेळगाव येथे होणाऱ्या आंतरराज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून बेळगावचे माजी खासदार बॅ.अरविंदसिंह पाटील , ब्रिगेडीअर सुधीर सावंत आदी निवड समितीमध्ये असलेल्या पुरस्कार वितरण समितीने हाजी रशिदखाँ जमादार यांची या पुरस्कारासाठी निवड केली असून रविवार ५ सप्टेंबर रोजी अरविंद घट्टी फार्म हाऊस , के.एल.ई. इंजिनिअरींग कॉलेज समोर , जोडकुरळी रोड , चिक्कोडी बेळगाव येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे .