गडचिरोली : आपल्या गडचिरोली जिल्ह्यात पोळा व तान्हा पोळा लहान मूल व शेतकरी बांधव मोठया उत्सहाने साजरा करीत असतात पण गेल्यावर्षी पासून कोरोणाचे संकट चालू असल्याने बैल पोळा तान्हा पोळा सणावर कोरोणाचे संकट आल्याने बैल पोळा सण गेल्या वर्षी साध्या पद्धतीने घरीच साजरा करण्यात आला.
त्याच प्रमाणे या वर्षी शासनाने थोडी शिथीलता दिली आहे. असे समजून अफवांवर विश्वास न ठेवता गर्दी न करता शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करूनच बैल पोळा सण साध्या पद्धतीने घरीच साजरा करण्यात यावा व शासनाने दिलेल्या नियमाचे काटेकोर पालन करावे व पोलीस विभाग व आरोग्य विभागाला सहकार्य करावे व आपणच आपली जबाबदारी घेणे गरजेचे आहे करीता येणारे उत्सव साध्या पद्धतीने घरीच साजरा करण्यात यावे असे आवाहन गडचिरोली जिल्ह्या परिषदच्या जिल्हा परिषद सदस्या सौ रूपालीताई पंदिलवार यांनी केली आहे
