सोलापूर : प्रहार शेतकरी संघटना व प्रहार दिव्यांग संघटना यांच्या वतीने माढा तालुक्यातील दीव्यांग व्यक्तींना अंतोदय शिधा पत्रिकेमध्ये समाविष्ट करून घेणे बाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र .बैठक 2020/प्र.क.19/नापू 28 नुसार निश्चित केलेल्या निकष अंतर्गत माढा तालुक्यातील सर दिव्यांग व्यक्तींना अनुद्ज्ञेय दिव्यांग शिधा पत्रिका व अनुषंगाने शिधापत्रिकेवर अनुज्ञेय असणारे लाभ तत्काळ देण्यात यावेत. त्यामुळे दिव्यांग व्यक्ती अन्न धान्य मिळण्यापासून वंचित राहणार नाहीत. त्यामुळे त्यांची मुलभूत गरज भागेल. सदर लाभ सर्व दिव्यांग व्यक्ती पर्यंत लवकरात लवकर पोहोच करावा ही विनंती प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने करण्यात आली. *माढा तालुक्यातील सर दिव्यांग व्यक्तींना अनुद्ज्ञेय दिव्यांग शिधा पत्रिका व अनुषंगाने शिधापत्रिकेवर अनुज्ञेय असणारे लाभ तत्काळ देण्यात यावेत आणि दिव्यांग व्यक्तीवर होणारा अन्याय दूर करण्यात यावा अन्यथा प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके यांनी दिला आहे.लवकरात लवकर दिव्यांगाना लवकर लाभ द्यावा.
प्रतिनिधी संदीप भगत