सोलापूर : लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांची जयंती वाटेगाव ता सांगली येथील जन्मस्थळी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी तेलंगणाचे लोकप्रिय मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे उपस्थितीत राहिले होते. अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती तर्फे साहित्य रत्न जन्मभूमी पुरस्कार अण्णाभाऊ साठे यांच्या सुनबाई सावित्रीमाई साठे यांच्या हस्ते श्री अमित होनमाने यांना देण्यात आला. या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल अमित होनमाने यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या सुनबाई सावित्रीमाई साठे आणि नातु सचिन भाऊ साठे व मानवहित लोकशाही पक्षाचे प्रवक्ते श्री सचिन लोंढे साहेब व जयंती महोत्सव समिती चे मनापासून आभार मानले
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी संदीप भगत सोलापूर..