(सचिन बिद्री:उमरगा)
आमदार ज्ञानराज चौगुले यांनी त्यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम निधी अंतर्गत मौजे.दाबका ता.उमरगा, जि उस्मानाबाद(धाराशिव)येथील महादेव मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लक्ष रूपये व मारूती मंदिराजवळ सभामंडप बांधणे 10 लक्ष रूपये असे एकुण 20 लक्ष रूपये निधी मंजुर केला आहे.या कामांचा दि.13 ऑगस्ट रोजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते व युवानेते किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमात बोलताना प्रा.शौकत पटेल सर यांनी जिल्हा परिषद शाळा 10 वी पर्यंत करणे, गावांतील रस्त्यांसाठी निधी मंजुर करणे व गैबीपीर देवस्थानचे तीर्थक्षेत्रात समायोजन करने, मुस्लीम कब्रस्थानला संरक्षक भिंत बांधने आदी मागण्यां मंजुर करणे बाबत आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याकडे ग्रामस्थांच्या वतीने विनंती केली व मंजुर केलेल्या कामाबद्दल त्यांचें आभारही मानले.
यावेळी तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, सरपंच कुसुमबाई मुटले, उपसरपंच गोविंद सुर्यवंशी, तंटामुक्त समिती अध्यक्ष अंबादास इंगळे, माजी सरपंच गोविंद पवार, प्रा. शौकत पटेल, प्रा.बी.एन.गायकवाड, प्रा. एस. के.पाटील, अंगद इंगळे, महेश भोसले, सरीता पवार, राहुल पवार, व्यंकट भोसले, मोहन गायकवाड, पंडीत माने, गुलचंद गायकवाड, प्रताप पाटील, बाळु पाटील, वनिता गायकवाड, शुभांगी पवार, बाळासाहेब माने, विनोद माने आदी जण उपस्थित होते.