नळदुर्ग :- नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून मिटकर परिवाराच्या वतीने केलेला माझा सत्कार हा प्रेरणादायी असून यापुढेही जनसामान्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असेन असे मत भारतीय जनता पार्टीचे नूतन जिल्हाध्यक्ष श्री.संताजी काका चालुक्य यांनी व्यक्त केले.
नळदुर्ग येथील मिटकर परिवाराच्या वतीने जानकी निवास,व्यास नगर येथे श्री.चालुक्य यांच्यासह श्री.संतोष राऊत मुख्य प्रशासकीय अधिकारी, उपमुख्यमंत्री कार्यालय,मंत्रालय,मुंबई.कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री.संतोष दादा बोबडे, नळदुर्ग पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस अधिकारी श्री.स्वप्निल लोखंडे, तुळजापूर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचे नूतन तज्ञ संचालक श्री,धनंजय मुळे,श्री.बालाजी माळी,नूतन तालुकाध्यक्ष श्री.सचिन राऊत यांचा कौटुंबिक स्तरावर अत्यंत दिमाखदार व देखना कार्यक्रम आयोजित केला होता.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, औक्षण,पुष्पवृष्टी,फटाक्यांची आतषबाजी करत शाल,प्रतिमा,हार,पुस्तक देऊन,फेटा बांधून मान्यवरांचा यथोचित सत्कार केला.
यावेळी श्री.राऊत म्हणाले की व्यक्तीच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाली म्हणजे काम करायला उत्साह येतो ते काम आज मिटकर परिवाराने केले आहे.याप्रसंगी श्री.लोखंडे यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बालाजी माळी यांनी केले.
यावेळी मिटकर कुटुंबातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.शिवाजीराव मिटकर, वागदरीच्या लोकनियुक्त सरपंच सौ.तेजाबाई मिटकर,शिक्षक नेते,पतसंस्थेचे चेअरमन श्री,प्रशांत मिटकर,राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे श्री.उमाकांत मिटकर,वात्सल्य सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी सौ.राधा मिटकर,आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त सौ,प्रणिता मिटकर,तसेच शिक्षक संघटनेचे,पतसंस्थेचे पदाधिकारी,वागदरी व नळदूर्ग मधील प्रतिष्ठित मान्यवर महिला-नागरिक उपस्थित होते