उमरगा तालुक्यातील कदेर येथे धम्मदेसणा बौद्ध धम्मात प्रत्येक पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक बौद्ध व्यक्तीने दर रविवारी, पौर्णिमेस विहारात गेलेच पाहिजे.विहारात धम्मदेसना ऐकून तसे आचरण करणाऱ्यांचा मार्ग दु:खमुक्तीकडे जातो,आयुष्यातील सर्व पीडा नष्ट होतात असे मौलिक विचार पूज्य भंते धम्मसार यांनी व्यक्त केले. विश्र्वशांती बुद्ध विहार कदेर व प्रबुद्ध बुद्ध विहार पंच कमेटी कदेर. येथील विश्र्वशांती बुद्ध विहार कदेर आयोजित केलेल्या धम्मदेसनेत ते बोलत होते.तथागत भगवान गौतम बुध्दांच्या जीवनातील पौर्णिमेस घडलेल्या घटनेचे सविस्तर वर्णन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाप्रसंगी माजी मुख्याध्यापक आर.व्ही.गायकवाड, डी.व्ही.कांबळे,आर.एस.कांबळे,ग्रामसेवक एल. डी.गायकवाड, विट्टल गायकवाड, रुपेश कांबळे,सौ.अनिता गायकवाड,उषा गायकवाड,यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व प्रथम तथागत गौतम बुध्द यांच्या प्रतिमेस पुष्प तर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आले. पूज्य भंते धम्मसार यांनी उपासक,उपासिकांना त्रिसरण, पंचशील दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.ब्रम्हानंद गायकवाड यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात धम्म संस्कार समाज बांधवांच्या दानातून आणि पूज्य भंते धम्मसार यांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने सुरू असल्याचे सांगितले यासह संस्थेच्या सद्य:स्थितीबद्दल व पुढील दोन-तीन वर्षांत होणाऱ्या समाजाभिमुख सर्वांगीण विकासाबद्दल सविस्तर माहिती दिली. तथागत गौतम बुध्दांनी ज्या पध्दतीने समाजातील शोषित, वंचितांचे दु:ख जाणून घेत त्यास समरस होण्याचा प्रयत्न केला, त्याप्रमाणे आपण सर्वांनीही वंचित, शोषितांच्या मदतीला पुढे यावे,असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास कदेर येथील भीम नगर व परिसरातील उपासक, उपासिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.