उस्मानाबाद,दि.05(जिमाका):- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद व पोलीस अधिक्षक कार्यालय,उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त जनजागृती व कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश,अंजु एस. शेडे याच्या अध्यक्षतेखाली 06 सप्टेबर रोजी सकाळी 09.00 वाजता, राजलक्ष्मी मंगल कार्यालय,रेल्वे गेटच्या बाजुला, गोवर्धनवाडी रोड, ढोकी,ता.जि.उस्मानाबाद येथे आयोजित केले आहे. तेव्हा नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव वसंत यादव यांनी केले आहे.