सचिन बिद्री:उमरगा

मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे. राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे अशी मागणी तीव्रपणे लावून धरत उमरगा तालुक्यातील माडज गावातील तरुण कै. किसन चंद्रकांत माने यांनी दि.6 सप्टेंबर रोजी गावातील तलावात उडी घेऊन आत्महत्या केली होती.

माने यांच्या कुटूंबियांना मा.राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांचे स्वीय सहायक तथा उमरगा लोहारा तालुक्यातून आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीची तयारी करत असलेले सातलिंग स्वामी यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शरद पवार, उमरगा तालुका संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अण्णाराव पवार, बलसुर जि.प.संपर्कप्रमुख आप्पाराव गायकवाड, उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनाअध्यक्ष अभय धनराज माने, निलेश गायकवाड, बळी मारेकर, बालाजी काळे, माडजचे उपसरपंच बलभीम काळे, ग्रामपंचायत सदस्य विजय माने, मनीष पांचाळ, ज्ञानबा फुगटे आदींनी हुतात्मा किसन माने यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करुन धीर व शासनाकडून जी कांही मदत असेल ती माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मदत करण्याचे आश्वासन दिले.
