तुळजापूर पोलिसांची कारवाई : बंधूक जप्त, गुन्हा दाखल
धाराशिव : तुळजापूर पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांचा शोध घेत कारवाई करण्यासाठी दि 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी तुळजापुर ते काक्रंबा जाणारे रोडवरील सोलापुर बायपास चौकामध्ये एक इसम गावठी बंदूक बाळगुण वावरत असताना निदर्शनास आले त्यास तुळजापूर पोलिसांनी ताब्यात घेत बंदूक जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. तुळजापूर सपोनि कांबळे यांच्यासह पोहेकॉ/१२४५ यादव पोअं/ १७९९ यांनी अवैध धंदयाची माहिती काढुन केसेस करण्याहेतू पो.नि.सो यांचे तोंडी आदेशाने पोलीस स्टेशन तुळजापुर हाददीतील प्रॉपर तुळजापुर येथे पेट्रोलिंग करीत असताना विश्वनाथ कॉर्नर येथे गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, तुळजापुर ते काक्रंबा जाणारे रोडवरील सोलापुर बायपास चौकामध्ये एक इसम स्वतःजवळ विनापास (परवाना) गावठी बंदुक बाळगुन आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्यानंतर गोपनीय माहिती पो.नि.सो यांना. कळुवन सदर ठिकाणी १८.१५ वाजता पोलिस पोहोचले तेथे एक इसम मिळुन आला त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव संभाजी लक्ष्मण अमृतराव वय ३७ वर्ष रा. खडकाळगल्ली तुळजापुर जि. धाराशिव असे असल्याचे सांगितले सदर इसमानाची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ एक लोखंडी धातुचे फिकट पांढऱ्या रींगाची देशी बनावटीची पिस्टल (अग्नीशस्त्र) २) एक पितळी धातुचा अंदाजे २.५ सेंटीमिटर लांबीचा जिवंत राऊंड असा मुददेमाल मिळुन आली असुन सदर मुददेमाल पंचा समक्ष जप्त करून आरोपी संभाजी लक्ष्मण अमृतराव वय ३७•वर्ष यास ताब्यात घेवून त्याचे विरुध्द पोहेकॉ अतुल भालचंद्र यादव यांच्या फिर्यादीवरून कलम ३,२५ शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत,उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख आणि पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि कांबळे हे करीत आहोत.