सौ.रूपालीताई पंदिलवार जिल्हा परिषद सदस्या
गडचिरोली : जिल्ह्यातील चामोर्शी तालूकयात येत असलेल्या चपराळा वन्यजीव अभयारण्य आष्टी परीसरातील गावांना वेढा घातला असून या अभयारण्यच्या जंगलात सरपण जमा करण्यासाठी व अंत्यसंस्कार करण्यासाठी काळ्या आणण्याकरीता जाण्यास बंदी आहे करीता एखादा व्यकती मृत्यू पावल्यास त्याचेवर अंत्यसंस्कार करण्याकरिता जळावू काळी मिळत नसल्याने आष्टी परीसरातील नागरिकांना मोठी अडचण निर्माण होत आहे या करीता वन विभागाने जंगलातून काळ्या आणण्याची परवानगी देण्यात यावी नाहीतर वनविभागाने जळावू बिटाचा साठा उपलब्ध करून ठेवावे आष्टी परिसरात मारकंडा कं येथे अभयारण्य वगळता एक प्रादेशिक वन विभाग आहे व एक वन विकास विभाग आहे परंतू कोणी मृत्यू पावल्यास अंत्यसंस्कार करण्याकरिता कधीही जलाऊ बिट मिळत नाही जलाऊ बिट उपलब्ध करून दिल्यास आष्टी परीसरातील नागरिकांना ईकडे तिकडे धावाधाव करण्याची वेळ येणार नाही करीता संबंधीत वनविभागाने आष्टी परीसरातील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन अंत्यसंस्कार करण्याकरिता तरी जलाऊ बिट उपलब्ध करून द्यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सौ. रूपालीताई पंदिलवार यांनी केली आहे