नाते बँकिंग सेवेच्या पलीकडे जपत मयताच्या कुटुंबातील सदस्यांना दिला धीर
सचिन बिद्री : उमरगा
उमरगा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या महिला शाखाधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि रिन सुरक्षा या एस बी आय बँकेच्या महत्वकांशी योजनेअंतर्गत दोन मयत (खातेधारकांच्या)लाभार्थ्याच्या वारसास प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन रु 43,00,000/- आणि 19,00,000/-
लाख रुपयांचा धनादेश नुकताच सुपूर्द
केला आणि दोन्ही परिवाराला धीर देत कुटुंबियांचे सांत्वनही केले.सौं शितल रासकर यांच्या तत्पर सेवेबद्दल परिसरातील जणसामान्यातुन विशेष कौतुक होत आहे.
उमरग्याच्या एसबीआय शाखेत गेल्या काही महिन्यापासून महिलाराज सुरु झाला असून बँकेची सूत्रे पहिल्यांदा महिला शाखाधिकारी सौ.शितल रासकर यांनी स्वीकारल्यापासून ग्राहक वर्गातून समाधान व्यक्त होताना दिसत आहे.बँकिंग कामकाज अगदी वेळेत आणि सहानुभूतीपूर्वक शिस्तबद्ध होत असल्याने ग्राहकांचा कल या बँकेकडे अधिक वाढत आहे.
उमरगा शहरातील पतंगे रोड येथील रहिवासी कै सुनील विठ्ठलराव बिराजदार यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर मोठे संकट ओढवले, कै सुनील यांचे एस बी आय बँकेत रु 16 लाख आणि रु 28 लाख रुपयांचे गृह कर्ज घेतलेले होते शिवाय प्रधानमंत्री सुरक्षा जिवन विमा योजनेअंतर्गत (अपघाती विमा)वार्षिक हप्ता रु 12 सुरक्षा कवच घेतला होता. तसेच गृहकर्ज घेतलेल्या रकमेवरही एस बी आय लाईफ ची ‘ई लाईट’ पॉलिसी आणि रिनरक्षाचा कवर करून ठेवल्याने त्यांच्या पश्चात बिराजदार कुटुंबीयांना शाखाधिकारी शितल रासकर यांनी त्यांच्या घरी जाऊन बँकिंग नात्याच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या धर्माचे दर्शन घडवत तब्बल रु 42,000,00/-(बेचाळीस लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.यावेळी बँकेचे लेखापाल स्नेहा मोरे, क्षेत्रअधिकारी शैलेश बिराजदार,एसबीआय लाईफ
विमा कंपनीचे विमा प्रतिनिधी सचिन जेवळे यांची या कामी विशेष मदत झाली.तसेच शहरातील खातेदार बब्रुवान नरसिंगराव फावडे (शिक्षक) यांचाही काही दिवसापूर्वी अपघाती निधन झाले. त्यांनी एस बी आय बँकेतून रु 19 लक्ष रुपयांचा गृहकर्ज(सन 2017 मध्ये)घेतलेला होता व प्रधान मंत्री सुरक्षा विमा कवच (वार्षिक रु 12 चा हप्ता) घेऊन ठेवल्याने आणि आपले गृहकर्जावर रिन रक्षा चा कवच लावल्याने त्यांचे पुर्ण कर्ज बँकेतर्फे माफ झाले असून अगदी तत्परतेणे शाखाधिकारी सौ शितल यांनी त्यांच्या कुटुंबियांना एकूण 19 लाख रुपयांचा धनादेश देत त्यांना धीर दिला. कै फावडे यांची मासिक पगार याच बँकेतील सॅलरी पॅकेज खात्यावर जमा होत होती या खात्यावरही रु 5 लाख रुपयांचा विमा असल्याने त्यांच्या कुटुंबियांना अतिरिक्त रु 5 लाखाचा नफा याठिकाणी झाला.
—-////—–
‘व्यावसायिक असो वा नौकरदार किंवा मजूर-कामगार, प्रत्येकानी बँकेत प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घ्यावा, यामध्ये केवळ वार्षिक 20 रुपया हफ्ता भरावा लागतो.केंद्र सरकारच्या या विमा योजनेचा प्रत्येकानी लाभ घ्यावा आणि बँकेतील कर्जावरपण रीन रक्षाचा कवच घेतल्याने तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला मोठा आधार होतो”.– सौ. शितल रासकर,शाखाधिकारी एस बी आय उमरगा