
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील हत्तेनगर भागात राहणाऱ्या एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मराठा आरक्षणासाठी जीव देणार आहे. हि घटना मंगळवार (दि.२१)रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या घटनेची माहिती अशी की, जळकोट (ता. तुळजापूर) येथील हत्तेनगर मध्ये राहणाऱ्या राहुल किसन जाधव(वय ३३) हा शिक्षण घेऊन बेकार होता. शिक्षण घेऊन नोकरी नसल्याने कामधंदा करून उदरनिर्वाह करत होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी मराठा आरक्षणाच्या विविध आंदोलनात राहुल जाधव सहभागी झाला होता. जळकोट येथे झालेल्या साखळी उपोषणातही त्यांनी आपला प्रत्यक्ष हातभार दिला होता.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली. राहुल जाधव या तरुणाने राहत्या घराच्या एका खोलीत पत्र्याच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हि आत्महत्याची घटना घडताच गावातील मराठा आरक्षणाच्या संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी घराकडे धाव घेऊन कुटुंबीयांना मदत केली. राहुल किसन जाधव यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्या चिठ्ठीत राहुल जाधव मराठा आरक्षणासाठी जीव देणार आहे. एक मराठा, लाख मराठा असा मजकूर लिहिलेला आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या सत्र सतत सुरू आहे.किसन जाधव यांच्या कुटुंबाला शासनाने मदत करावी. अशी मागणी सकल मराठा परिवाराच्यावतीने केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस चे अधिकारी घटनास्थळ पंचनामा केला व पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत