वेश्या व्यावसायाच्या कारवाई लॉजमालक व मॅनेजर विरुध्द गुन्हा दाखल
धाराशिव : पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या पथकाने जिल्हातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढुन कायदेशीर
कारवाई करण्यासाठी दि. ३०.१२.२०२३ रोजी गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती
मिळाली कि उमरगा येथील आरोग्य नगरी येथील शांतादुर्गा लॉज चालक- व्यवस्थापक हॉटेलमध्ये काही
महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवून घेत आहेत. यावर पथकाने एका बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री
करुन नमूद लॉजवर छापा टाकला असता लॉज मध्ये एक महिला (नाव- गाव गोपनीय) आढळुन आल्याने महिला पोलीसांमार्फत त्यांची विचारपुस केली असता हॉटेल चालक १) धनराज हरिश्चंद्र तेलंग, वय ४२ वर्षे, व्यावसाय मॅनेजर (शांतादुर्गा लॉज), रा. न्यु बालाजी नगर उमरगा २) रविंद्र महादेव महतो, वय ३५ वर्षे,
व्यावसाय- वेटर (शांतादुर्गा लॉज), रा. कमरवली थाना पिपराही जि. शिवहर राज्य बिहार ह.मु. शांतादुर्गा लॉज ता.
उमरगा (लॉज मालक) ३) आशा रामचंद्र तेलंग रा. उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांचे
सांगण्यावरुन त्या महिलेस वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन तिस लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करत
होते व नमुद तिघेजण त्यावर स्वतःची उपजिवीका करत आहेत असे समजले. यावरुन पथकाने लॉज मॅनेजर
नामे- १) धनराज हरिश्चंद्र तेलंग, वय ४२ वर्षे, व्यावसाय मॅनेजर (शांतादुर्गा लॉज), २) रविंद्र महादेव महतो, वय ३५ वर्षे, व्यावसाय वेटर (शांतादुर्गा लॉज),यांना ताब्यात घेउन त्यांच्या
ताब्यातील दोन मोबाईल फोन, नोंदीचे रजिस्टर,, रोख रक्कम ८,३०० व निरोधची पाकीटे, लोखंडी पलंगावरील
बेडसीट असा एकुण २८,३०० ₹ माल हस्तगत केला. पोलीसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजवरील
त्या महिलेची सुटका करुन (लॉजमालक) १) आशा रामचंद्र तेलंग रा. उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव लॉज
मॅनेजर-२) धनराज हरिश्चंद्र तेलंग, वय ४२ वर्षे, व्यावसाय मॅनेजर (शांतादुर्गा लॉज), रा. न्यु बालाजी नगर उमरगा
जि. धाराशिव ३) रविंद्र महादेव महतो, वय ३५ वर्षे, व्यावसाय वटर (शांतादुर्गा लॉज), रा. कमरवली थाना
पिपराही जि. शिवहर राज्य बिहार ह.मु. शांतादुर्गा लॉज ता. उमरगा जि. धाराशिव, यांचेविरुध्द गुरनं ७०१/२०२३ भा.दं.वि. सं. कलम- ३७०, ३७० (अ) (२), ३४ सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम- ३,४, ५ अन्वये उमरगा पोलीस ठाण्यात दि.३०.१२.२०२३ रोजी गुन्हा नोंदवला आहे.तसेच धाराशिव शहरात तुळजापूर ते धाराशिव नॅशनल हायवेच्या रस्त्यालगत असलेल्या ‘निसर्ग गारवा लॉज’ येथील रॅकेट उघड केल्यानंतर पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे व पथकाने उमरगा
येथील रॅकेट उघड केले आहे.
सचिन बिद्री : उमरगा