section and everything up until
* * @package Newsup */?> उस्मानाबाद (धाराशिव ) लोकसभेच्या रिंगणात MIM गोला भाई ची एन्ट्री…! | Ntv News Marathi

विरोधकाच्या डोकेदुखी वाढणार?

लोकसभा निवडणुकीसाठी ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच MIM ने महाराष्ट्रात तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर MIM उस्मानाबाद (धाराशिव )जिल्ह्यात चाचपणी सुरू केली.
औरंगाबाद( संभाजीनगर) चे खासदार इम्तियाज जलील यांनी गोलाभाई उर्फ सिद्दीक यांना लोकसभा लढवण्याचे आदेश दिले. या आदेशाचे पालन करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला..
उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघांमध्ये एम. आय. एम ला मानणारा वर्ग बहुसंख्या आहे .त्यामुळे भाजप आणि शिवसेना गटाची डोकेदुखी मात्र नक्कीच वाढणार आहे..

उमेदवाराची मूळ गाव बेंबळी असून त्यांचे पूर्ण नाव सिद्दिकी उर्फ गोलाभाई इब्राहिम बोडीवाले असून त्यांनी पहिली निवडणूक …. अपक्ष म्हणून लोकसभा लढवली जिल्हा परिषद .लढवली त्यानंतर पंचायत समिती .व तीन वेळेस ग्रामपंचायत सदस्य असून जिल्ह्यामध्ये त्यांचा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात जनसंपर्क मोठ्या प्रमाणात असल्याने आतापर्यंत केलेले सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कामाची फायदा नक्कीच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्यांनी केलेले कार्य
पाठपुरावा करून ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आला जिल्ह्यातील असंख्य शमशानभूमी ते वॉल कंपाऊंड चे काम वाणी ग्रामीण भागामध्ये रस्ते गटार अशा अनेक मूलभूत योजना सर्वसामान्याला शासनाच्या योजना मिळवून देण्याचे काम त्यांच्या माध्यमातून करण्यात आला त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना वीज खंडित होणे यासाठी महावितरण विभागाकडे पाठपुरावा करून डीपीही मिळवून देण्याचे प्रयत्न केले. माणुसकीचे दर्शन घडवण्याचं वेळ कोरोना मध्ये आली त्यावेळेस स्वतःला परवा न करता इतरांचे जीव वाचून यामध्ये स्वतःची रुग्णवाहिका त्यांनी जिल्ह्यासाठी दिली परिसरातील इतर रुग्णांना ते मुंबईसारख्या रुग्णात मुक्त उपचार करत आहेत. त्यांनी केलेले समाजकार्य मुळे जिल्ह्यामध्ये त्यांचा जनसंपर्क हा मोठ्या प्रमाणात असल्याने कार्यकर्ते ची इच्छा लोकसभा लढवावी अशी इच्छा व्यक्त केल्याने आणि पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या ते पारदर्शीपणे पार पाडल्याने पक्ष वाढीसाठी त्यांनी केलेले कामाने त्यांना हे उमेदवारी जाहीर झाली आहे..

उस्मानाबाद धाराशिव जिल्हा आत्महत्या जिल्हा म्हणून ओळखला जातो ह्या जिल्ह्याची कलंक पुसण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करून सर्वसामान्य शेतकरी युवकांना यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार.. जिल्हा विकास कामापासून वंचित आहे जिल्ह्याचा विकास करणार.
जिल्ह्यातील दोन्ही उमेदवारांनी अर्चना पाटील ओमराजे निंबाळकर यांनी घरातले भांडणासाठी जिल्ह्याचा विकास नाहीतर भकास केला. जिल्ह्याचा विकास करण्यासाठी एम आय एम पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून लोकसभा लढवत आहे. उमेदवारांनी स्पष्ट केला आहे
संभाजीनगर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी पक्षातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना एकत्र येऊन उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करावा असा आव्हान करण्यात आला.

एम आय एम पक्षाची एन्ट्री उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघांमध्ये विरोधकांची मात्र डोकेदुखी वाढताना पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *