(सचिन बिद्री)
उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारांनो, आमच्या भाग एक आणि भाग दोन च्या विशेष वार्तापत्राला असंख्य वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला त्यामुळेच ही शृंखाला आपल्या मागासलेल्या जिल्ह्याच्या खऱ्या अर्थाने विकासासाठी सुरु आहे. यामध्ये आपली भूमिका निर्णायक ठरणार आहे.
शैक्षणिक,औद्योगिक,सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा अश्या सर्व क्षेत्रात आपलं जिल्हा मागासलेला आहे ते कश्यामुळे आहे याचं प्रत्यय आपण पहिल्या भागात पहिले आहे आणि दुसऱ्या भागात जिल्ह्याला काय हवं आहे हेही आपण संदर्भासहित स्पष्टीकरण दिला आहे. मुळात आपला जिल्हा जरी मागासलेला असला तरी याच जिल्ह्यात करोडपती लोकांची संख्याही आहे. एक खुप मोठी आर्थिक दरी(विषमता)या भागातील लोकांत निर्माण झाली आहे.याला कारणीभूत क्षणिक सुखासाठी आपलं अमूल्य मत विकणारा मतदार आहे. पण आता वेळ आली आहे आपल्या मताची ताकत दाखविण्याची. सुपर 30 नामक एका हिंदी चित्रपटातील नायक रोशण चा एक डायलॉग मला आठवतं ”अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा. ” या वाक्यात खुप मोठा अर्थ दडलेला आहे. आपण खुप समजदार आहात.
फेसबुक सारख्या सोशल मीडियाला पैसे मोजून नेत्यांचा पब्लिसिटी स्टंट..?
फेसबुक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर एखाद्या खातेधारकाचे मित्र(फॉलोवअर्स) 5 हजार जरी असले आणि त्या संबंधित खातेधारकणे एखादा फोटो किंवा व्हिडिओ अपलोड केला तर संबंधित पोस्ट सर्व मित्रांना(फॉलोव्हर्सना) दिसत नसते केवळ किमान प्रथम 20 ते 25 मित्र/फॉलोअर्स ना दिसते त्या संबंधित पोस्ट ला एखादा लाईक/कमेंट पडल्यावर ती पोस्ट पुढील 25 ते 50 जणांना दिसू लागले असे करत गुणाकार होतो आणि जेवढे लाईक/कमेंट अधिक तेवढ्याच पटीत ती संबंधित पोस्ट व्हायरल होत जाते. पण फेसबुक कंपनीला पैसे दिले तर संबंधित पोस्ट स्वतः फेसबुक कंपनी व्हायरल करते हा फेसबुक चा व्यवसाय आहे. याला पोस्ट बूस्ट करणे असे म्हणतात.
आपल्या फेसबुक खात्यावर/पेजवर एखादि पोस्ट शेअर केल्यावर ती पोस्ट लोकांना आवडली तर ऑटोमॅटीक पोस्ट व्हायरल होते. पण काही फेसबुक यूजर संबंधित पोस्ट व्हायरल कारण्याहेतु बूस्ट पोस्ट (पैश्याचा)आधार घेतात.सामान्यतहा
या सुविधाचा वापर आवर्जून छोटे मोठे व्यापारी, उद्योजक वर्ग असतो आपल्या वस्तू, प्रोडक्शन,सर्व्हिसेस बाबाब काम्पनीची जाहिरात कारण्याहेतु करतात.
पण अलीकडच्या डिजिटल काळात जिथे लोकं टी व्ही चॅनल्स पाहणे बंद करून सर्वाधिक वेळ मोबाईलला देतात विशेष करून सोशल मीडियावर घालवतात तिथं काही टी व्ही चॅनल्स पण आपल्या बातम्या आणि काही वेळा लाईव्ह स्ट्रीम फेसबुक वर दाखवतात इथे त्यांना अधिक प्रेक्षक प्राप्त होतात वेळ प्रसंगी फेसबुक ला एक मोठी अमाऊंट खर्चही करतात त्या संबंधित पोस्ट ला स्पॉन्सर्ड म्हणतात.
आता फेसबुकच्या या सुवीधेचा वापर बरेच लोकप्रतिनिधीही करताना सर्रास दिसून येतात. यामध्ये आपला मागासलेला धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा मागे नाही.
उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्याही बऱ्याच पोस्ट स्पॉन्सर्ड असतात याचे पुरावे हाती लागले आहेत. इथे प्रश्न असा निर्माण होतो की, हे सर्व विकासासाठी धडपडनारे नेते,ज्यांचे हजारो लाखो फॉलोवर्स निर्माण झालेले असतील, ज्यांच्या सभेला अनेक वेळा मोठी गर्दी दिसून येते, ज्यांच्या शक्तीप्रदर्शनाला हजारो लोक दिसून येतात मग यांना फेसबुक ला पैसे मोजायची आवश्यकता का भासत असेल..?लोकांच्या ऱ्हदयातील खरा नेता असेल तर लोक फेसबुक ला आपल्या नेत्यांची पोस्ट पाहून लाईक कमेंट शेअर करतीलच ना.. मग अश्या नेत्यांना फेसबुकला पैसे देऊन लाईक्स मिळवण्याची का आवश्यकता भासत असावी.?का कुठेतरी यांनाही भिती आहे की आपल्या पोस्ट ला कमी लाईक्स, कमेन्ट भेटले तर आपली प्रतिष्ठा काय निर्माण होईल.? त्यामुळे कदाचित फेसबुक ला पैसे देत असतील..?जेणेकरून जास्तीतजास्त लाईक्स, कमेंट्स प्राप्त होतील आणि आपली पोस्ट व्हायरल होईल आणि आपली जिल्ह्यात, राज्यात, देशात पब्लिसिटी होईल…!
एवढे नेते मंडळी जिल्ह्याच्या विकासासाठी धडपड करीत आहेत तरी एवढ्या वर्षात जिल्हा अद्याप मागासलेला का राहिला असावा.? अजूनही जिल्ह्यातील विद्यार्थांना चांगले शिक्षण घ्यायचे म्हटले तर शेजारील लातूर किंवा पुण्याला जावं लागतं, तेही ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली तेच जिल्ह्याबाहेर जाऊन चांगले शिक्षण घेऊ शकतात. रोजगार तर शोधूनही भेटत नाही.अश्या या महागाईच्या काळात काबाडकष्ट करून पालक आपल्या पाल्याना शिकवतो आणि पाल्य रोजगारच्या शोधात पुण्याला किंवा मुंबईला जाऊन भेटेल ती नौकरी करायला तयार होतो कारण त्याला आपल्या आईवडिलांचा आधार बनायचा असतो.अशी काही अवस्था जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणी व तरुणांची झाली आहे. पण स्थानिक नेते विकासाच्या मुद्यावरच आजपर्यंत निवडून आले आहे आणि निवडून येतीलही पण विकास काही जिल्ह्याचा होताना दिसत नाही.पण सोशल मीडियावर पैसे खर्च करून पब्लिसिटी मिळवताना जिल्ह्यातील बरेच नेतेमंडळी दिसून येतात.हाच फॉर्मयुला ट्वीटर, इन्स्टाग्राम,व्हाट्सअप वर पण लागू आहे. जो जेवढे अधिक पैसे सोशल मिडीया कंपनीला मोजेल तो तेवढ्या प्रमाणात अधिक फेमस होईल. पण पैश्याच्या जोरावर पब्लिसिटी प्राप्त करणे कितपत योग्य आहे, तेही एखाद्या विकासासाठी धडपडनाऱ्या नेत्याला ज्यांच्या एखाद्या सभेला पैसे न खर्च करता हजारो लोकं उपस्थित राहतात.?
उमरगा शहरातील एस टी स्टॅन्ड परिसरातील एका भजीवडापाव तयार करणाऱ्या गाड्यावर अगदी 8 वयोवर्षाचा मुलगा आपल्या हाताने उकळत्या तेलात भजी सोडत होता, मोठ्या प्रमाणावर भजी खाणारे ग्राहकपण होते. त्याला पाहून मला आपल्या जिल्ह्याचा विकास दिसत होता. असे असंख्य लहान लहान मुले आपल्या आर्थिक अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतील. अनेक युवक आता नौकरीचा शोध न घेता अवैध धंद्याकडे वळत आहेत. बऱ्याच युवकांमध्ये व्यसनाधीनता आणि गुंडप्रवृती वाढत आहे, याकडे कोणाचेचं लक्ष नाही.आपण फक्त नेत्यांची फेसबुकवरील स्पॉन्सर्ड पोस्ट पाहून लाईक ठोकन्यात आयुष्य वेचत आहोत आता मात्र तुमच्या हाती संधी आहे, मतदान स्वरूपात परिवर्तन घडवून आपलं हक्क बजावण्याची संधी आहे.
——-///—–//——-
“धाराशिव जिल्ह्यातील जवळपास सर्व पक्षाचे सर्व नेते स्वतःच्या प्रसिद्धीला अधिक महत्व देतात,याचे हे एक जिवंत उदाहरण म्हणजे फेसबुकला हजारो लाखो रुपये देऊन स्वतःची पोस्ट बूस्ट करून व्हायरल करण्याचा प्रयत्न ते करत असतात. पण जसे लोकांना गोदी मीडियाची जान झालीय,त्याधर्तीवर टी व्ही चॅनल्स वर बातम्या पाहणे बंद केले आहेत.तसें आता सोशल मीडियावरील फेक पोस्ट, आय टी सेल च्या भ्रामक पोस्ट आणि नेत्यांची स्पॉन्सर्ड पोस्ट बाबत सत्यता सर्वांना माहिती होत आहे”.–श्री.विठ्ठल सूर्यवंशी -संगणक अभियंता (सोशल मीडिया विशेषज्ञ)
उर्वरित पुढील भागात…