महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सचिव व भीमशक्ती सामाजिक संघटनेचे प्रदेश सचिव विनय कांबळे यांची मागणी
महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी चे कार्याध्यक्ष. ऑल इंडिया वर्किंग काँग्रेस कमिटी चे सदस्य माजी आमदार चंद्रकांत हंडोरे यांना ऑल इंडिया काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष मा. मालिकार्जून खर्गे यांनी संधी द्यावी .तसा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांनी दिल्ली ला पाठवावा सध्या महाराष्ट्रातून राज्यसभेच्या ६ जागा रिक्त होत आहे
.मागच्यावेळी हंडोरे साहेबाना आदरणीय खा.राहुलजी गांधी व काँग्रेसच्या नेत्या मा.सोनियाजी गांधी यांनी विधानपरिषदेचे तिकीट दिले होते.प्रथम पसंतीचे मतदान हंडोरे साहेब यांना करण्याच्या सूचना दिल्ली हून काँग्रेसच्या आमदारांना दिलेल्या होत्या पण काँग्रेस चे सहा ते सात आमदारांनी विरोधात मतदान केले त्यामुळे नंबर दोन चे उमेदवार निवडून आले व हंडोरे साहेबांचा पराभव झाला.एका आंबेडकरी नेत्याचा पराभव सर्व आंबेडकरी समाज्याच्या जिव्हारी लागला .मागासवर्गीय नेत्याला विरोध करायचा म्हणून पक्षाच्या प्रस्थापित नेत्यांनी विरोधात मतदान केले. मा.चंद्रकांत हंडोरे साहेबाना मानणारा आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यांनी समाजकल्याण मंत्री असताना मागासवर्गीयांच्या हिताच्या अनेक योजना राज्यात रबिवल्या.रमाई आवास योजना.कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना.
समाजातील युवक उद्योजक व्हावा या साठी औद्योगिक संस्था.विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी मदत इत्यादी भरपूर कामे त्यांनी केली ते अजूनही मागासवर्गीय जनता विसरली नाही .त्यांनी स्वतः भीमशक्ती सामाजिक संघटना स्थापन केलेली असून भीमशक्ती संघटने मध्ये हजारो पदाधिकारी पूर्ण राज्यात काम करतात याचा फायदा काँग्रेस पक्षाला होणार आहे .ज्यावेळी साहेबांचा पराभव झाला त्यावेळी साहेबांनी अन्याय झाला म्हणत पक्ष सोडला असता पण साहेब पक्षाशी एकनिष्ठ व प्रामाणिक राहिले त्यांनी कधीही पक्ष सोडण्याचा विचार केला नाही अश्या प्रामाणिक नेत्याला पक्षाने राज्यसभा वरती घेवून काम करणेची संधी द्यावी या निर्णयाचा काँग्रेस पक्षाला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत फायदा होईल .
प्रतिनिधी राहुल वाडकर सांगली