आष्टा दि.येथील कासेगाव शिक्षण संस्थेच्या आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स काॅलेज च्या एन.एस.एस कँप च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले
“राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांसाठी स्वयं संस्काराला आकार देण्यासाठीचे एक मोठे माध्यम आहे. विद्यार्थीदशेपासूनच व्यक्तिमत्व विकासाचे अनेकविध पैलू स्वतःमध्ये विकसित करण्यासाठी विशेष श्रम संस्कार शिबिराचा कालावधी हा सुवर्णकाळच असतो.” असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे, आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा. श्री. श्रीकृष्ण कटकधोंड यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या आधुनिक युगात विद्यार्थ्यांनी आपले कर्तव्य आणि नेतृत्व सिद्ध करण्यासाठी कौटुंबिक आधाराच्या वलयातून बाहेर पडून आपल्या व्यक्तिमत्व विकासाला व समाज हिताला प्राधान्य दिले पाहिजे. व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत आत्मशांती सारख्या व्यक्तिमत्व विकास साधनाचा वापर करून आपल्या विचारांची परिपक्वता घडवून आणणे आवश्यक आहे.” या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी कासेगाव शिक्षण संस्थेचे, सचिव प्राचार्य आर. डी. सावंत होते.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य आर. डी. सावंत म्हणाले, "दैनंदिन जीवनातील कोणतेही काम हे छोटे किंवा मोठे नसून त्या श्रमाचे मूल्य व प्रतिष्ठा वाढवण्याची क्षमता ही आपल्याच हातात असते. प्रत्येकाने स्वतःला घडवताना आत्मपरीक्षण, आत्मशोध व आत्मभान यांचा अवलंब करून आपले व्यक्तिमत्व अधिकाधिक प्रभावी कसे होईल याकडे लक्ष दिले पाहिजे" असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.शशिकांत मोहिते यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.अमित पाटील यांनी करून दिले. सूत्रसंचालन डॉ.मेघा माळी यांनी केले. तर आभार प्रा. नंदकुमार ठोंबरे यांनी मानले. याप्रसंगी आष्टा महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थेचे सहसचिव डॉ.राजेंद्र कुरळपकर, विजयराव यादव,व लालासो अनुसे यांनी मनोगत व्यक्त केले.
मौजे बावची गावचे सरपंच मा. सौ. कविता लालासोा अनुसे, उपसरपंच मा.श्री. प्रशांत श्रीकांत पाटील, लक्ष्मीपार्वती उद्योग समूहाचे मा.श्री. काकासाहेब कोकाटे, विठ्ठलदादा ग्राम.बि.शे.सह.पतसंस्थेचे चेअरमन मा.श्री. उदयराव यादव, कार्यक्रमाधिकारी डॉ. डी.जे.दमामे, महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.