अर्जुन माने म्हणाले, विशेष रस्ता अनुदान व विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजना मधून सन 2021मध्ये आ.जयंतरावजी पाटील साहेब यांनी आष्टा शहरातील काही पाणंद रस्ते व दोन सभागृह बांधणीसाठी 1 कोटी 72 लाखांचा निधी मंजूर केला. यामध्ये 1 कोटी 27 लाखांचा निधी रस्त्यासाठी व 45 लाखांची 2 सभागृहे बांधण्यात येणार होती. परंतु सदर कामास जुलै 2022 मध्ये शासन स्तरावर स्थगिती आली. डिसेंबर 2023 मध्ये त्यावरील स्थगिती उठल्याने सदर निधी आष्टा नगरपरिषदेकडे वर्ग होणार आहे व या निधीतून शहरात 2 सभागृहे व 8 पाणंद रस्ते व मळे रस्ते होणार आहेत. हा निधी आ. जयंतरावजी पाटील साहेब यांच्या विशेष प्रयत्नातूनच शहराच्या विकासासाठी आला आहे. जिथे गरज आहे तिथे विकासकामे होत असून याबाबत जनतेत समाधानाचे वातावरण आहे. याउलट विरोधक कोणताच विशेष निधी न आणता फक्त राजकारण म्हणून शहरात येणारा रेग्युलर निधी हा आम्ही मंजूर करून आणला असा दिंडोरा पिटत आहेत. शहरात होणारी विकास कामे त्यासाठी लागणारा निधी हा येतच असतो भले, कोणत्याही पक्षाचे सरकार वा कोणीही पालकमंत्री असो. याचे श्रेय लाटून कोणीही जनतेची दिशाभूल करू नये. जयंतरावजी पाटील साहेब पालकमंत्री असताना व नंतरच्या काळात किती निधी शहराच्या विकासासाठी आला याची माहिती लवकरच आकडेवारीसह देऊ असेही अर्जुन माने म्हणाले.
आजपर्यंत शहराचा विकास हा आ.जयंतरावजी पाटील साहेब व स्व.मा.आ.विलासरावजी शिंदे साहेब यांच्या दूरदृष्टीतून झाला आहे. साहेबांनी पालकमंत्री असताना तालुक्याच्या विकासाबरोबर कृषिप्रधान विस्तारित आष्टा शहराच्या विकासासाठी पाणंद रस्ते व मळे भागातील रस्ते, शहराला जोडणारी वाडी वस्तीचे रस्ते कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. पालकमंत्री काळात त्यांनी 5 कोटींचा विशेष निधी शहरासाठी दिला. यातून शहराभोवतालचे जवळपास14 पाणंद व मळे रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण झाले. शहरातील दोन बगीच्यांचे काम पूर्णत्वास आले आहे. वाढती मागणी पाहता पुन्हा जयंतरावजी पाटील साहेबांनी 1 कोटी 55 लाखाचा निधी मंजूर केला. यातून 5 पाणंद व मळे रस्ते व 1 सभागृह तयार झाले.
चौकट करणे
आष्टा शहरासाठी वर्षभरात आलेल्या निधीचे खोटे आकडे सांगून विरोधक जनतेची दिशाभूल करीत आहेत. जयंतरावजी पाटील साहेब पालकमंत्री असताना व आताच्या निधीचे आकडे लवकरच जाहीर करून नगरपरिषदेकडे येणारा प्रत्येक रेग्युलर निधी हा आम्हीच आणला म्हणून पेपरबाजी करणाऱ्यांचा भांडाफोड करून त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणू.
—– अर्जुन माने,
माजी नगरसेवक आष्टा