सांगली:- अत्यावश्यक शेतीमालाचे भाव वाढवून अल्पकाळात सामान्य नागरिकांना लुटायचे अन् पुन्हा भाव पाडून शेतकर्यांचे ही नुकसान करायचे असा नवा फंडा केंद्र सरकारने राबविण्यास सुरुवात केली आहे.व्यापारी व सरकार यांच्या संगनमताने या गोष्टी घडत आहेत.शेतकर्यांना व सर्वसामान्य नागरिकांना लुटणाऱ्या सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी कट्टीबध्द व्हावे . असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड प्रका रथश आंबेडकर यांनी बु़धवारी सांगलीत केले. सांगलीच्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर बुधवारी वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन निर्धरण सभा पार पडली .यावेळी पक्षाचे नेते जयसिंग शेंडगे , सोमनाथ साळुंखे , डॉ क्रांती सावंत , दिशा पिंकी शेख , आदि उपस्थित होते