रस्ते व नाल्या बांधकामांचे भूमिपूजन भाग्यश्रीताई आत्राम(हलगेकर)यांच्या शुभहस्ते
सिरोंचा:- महाराष्ट्र राज्याचा शेवटच्या टोकावर असलेलं नवनिर्माण नगरपंचायत सिरोंचा शहरातील प्रत्येक प्रभागात विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी जिल्हापरिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठचे नवनिर्वाचित सदस्यां सौ.भाग्यश्रीताई(हलगेकर)आत्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.सिरोंचा नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सत्ता नसतानाही यावेळी निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक व नगरसेविकानी भाग्यश्रीताई हलगेकर(आत्राम)यांच्याकडे शहरातील रस्ते व नाली बांधकाम करण्यासाठी मागणी केली होती.प्रभागातील नागरिकांची व नगरसेवक,नगरसेविकांची मागणी लक्षात घेता,महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री मा.ना.धर्मरावबाबा आत्राम साहेब यांच्याकडे ही मागणी केली असता मंत्री साहेबानी कोट्यवधी रुपयांची निधी उपलब्ध करून दिली असून या विकास कामांचे भूमिपूजन भाग्यश्रीताई हलगेकर(आत्राम)यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित सिरोंचा नगरपंचायतचे मुख्याधिकारी श्री.जितेंद्र शिकतोडे साहेब,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी,रा.महिला कांग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष सौ.वेंकटलक्ष्मी आरवेल्ली,नगरसेवक जगदीश राल्लाबंडीवार,नगरसेवक सतीशभाऊ भोगे,नगरसेवक रंजितभाऊ गागापुरपूवार,नगरसेवक सतीशभाऊ राचारला, स्वीकृत नगरसेवक नागेश्वरराव गागापुरपूवार,नगरसेविका सपना तोकला,नगरसेविका महेश्वरी पेद्दपेल्ली,शहर अध्यक्ष विजय रंगुवार,राष्ट्रवादी कांग्रेस महिला तालुका अध्यक्ष मनिषा चल्लावार,kondra विश्वेश्वरय्याजी,मदनय्या मादेशी,गणेश बोधनवार,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते.