दोन शेतकऱ्यांचा करंट लागून जागिच मृत्यू
कळमेश्वर तालुक्यातील बुधला जवल असलेल्या मधुगंगा तलावातिल शेतात पाणी देणाऱ्या मोटारपंपाची दुरुस्ती करून ते सुरू करण्यासाठी गेलेल्या
दोन शेतकऱ्यांचा विजेचा करंट लागून जागीच मृत्यू झाला. ही घटना १ एप्रिलला दुपारी १२ वाजता घडली. या घटनेमुळे मृतकांच्या परीवारावर
दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
१) गौरव गोविंदा बोराडे (३५, रा. वॉर्ड क्रमांक ६ मोहपा ) व २)अनिल चौधरी (४१, रा. वॉर्ड क्रमांक १२, मोहपा) अशी मृतकांची नावे आहेत. मृतक गौरव व अनिल हे शेतीच्या मोटारपंप दुरुस्तीसाठी बुधला मधुगंगा येथील
तलावात दुपारी १२ वाजता गेले होते. मोटारपंप सुरू केल्यानंतर गौरवचा अचानक तोल गेला आणि उघड्या वायरला स्पर्श झाला. गौरवच्या
शरीरात वीजप्रवाह संचारल्याने तो अस्वस्थ झाल्याचे बघून त्याला वाच विण्यासाठी अनिल गेला असता त्यांलाही करंट लागला. या घटनेत
दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
कळमेश्वर पोलिसांना माहिती होताच
घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. मृतक गौरव बोराडे अविवाहित असून अनिल चौधरीला एक मुलगा,
एक मुलगी आहे. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकां च्या स्वाधीन करण्यात आला. घटनेचा पुडिल तपास कळमेश्वर पोलीस ठाण्याचे ठाणेदार योगेश कामाले यांच्या मार्गदर्शनात हेडकॉन्स्टेबल पंकज गाडगे हे करीत आहेत.
प्रतिनिधि (मंगेश उराडे नागपुर) जिला