उपविभागिय अधिकारी , तहसिलदार सहित अनेक मान्यवर उपस्तीत होते
सावनेर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र दिन उत्साहात
साजरा करण्यात आला.विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी यांचे हस्ते
उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार मल्लिक विराणी, पोलिस निरीक्षक रवींद्र मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलिस आणि होमगार्ड पथकाने मानवंदना दिली. यावेळी नायब तहसीलदार संजय अनव्हाने, विजय कोहळे, दिनेश टेकाडे,राजेश शेगावकर, उपविभागीय अभियंता नरेंद्र निमजे, गटविकास अधिकारी
मनोजकुमार हिरुळकर, नगर परिषद मुख्याधिकारी किरण बागडे, उपविभागीय अभियंता सुनीलकुमार दमाहे, शासकीय रुग्णालयाच्या प्र-पाठक मंजुषा ढोबळेआदीसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते
(मंगेश उराडे नागपुर जिल्हा प्रतिनिधि)